Shobhaa De: इंडियन एक्सप्रेसच्या ‘द सुवीर सरन’ शोमध्ये ज्येष्ठ साहित्यिका, स्तंभलेखिका, पत्रकार शोभा डे हजेरी लावणार आहेत. शोभा डे यांनी ५० वर्षांच्या लेखनाच्या कारकिर्दीत आजवर अनेक विषयांना हात घातला. सोशल मीडियाचा उदय झाल्यानंतर एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरही त्या बिनधास्तपणे व्यक्त होताना दिसल्या. वैयक्तिक आयुष्यात शिस्तीला सर्वाधिक महत्त्व देणाऱ्या शोभा डे यांचा राजकारणी, सेलिब्रिटी, क्रीडापटू यांच्याशी लेखनानिमित्त संबंध आला. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याबद्दल त्यांचे विचार काय आहेत? अशा अनेक विषयांवर ‘द सुवीर सरन’ शोमध्ये त्या व्यक्त होतील.
सदर मुलाखत खालील लिंकवर पाहू शकता.
शोभा डे यांच्या काही विधानांवर वादही निर्माण झाले होते. २०१६ रोजी त्यांनी ऑलिम्पिक खेळाडूंसंदर्भात एक पोस्ट टाकली होती. त्यावरून त्यांनी वाद ओढवून घेतला होता. “ऑलिम्पिकला गेलेले खेळाडू तिथे जाऊन सेल्फी काढतात आणि रिकाम्या हाती परत येतात. देशाचा पैसा आणि संधी वाया घालवतात”, अशा आशयाची पोस्ट त्यांनी टाकली होती.
तसेच राज्यातील सर्व मल्टिप्लेक्समध्ये प्राईम टाइममध्ये मराठी चित्रपट दाखवण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी २०१५ साली टीका केली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या टर्ममध्ये झालेल्या या टीकेनंतर त्यांच्यावर विधानसभेत हक्कभंग आणण्याची मागणी काही आमदारांनी केली होती.