‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील गाण्यांनी प्रत्येक सिनेरसिकाच्या मनामध्ये एक विशेष स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटातील ‘पिंगा’, ‘गजानना’ आणि ‘दीवानी मस्तानी’ गाण्यांनी प्रेक्षकांची प्रशंसा मिळविली आहे. त्यानंतर आता ‘मल्हारी’ हे विजयगीत प्रदर्शित करण्यात आले आहे.
या गाण्याचे चित्रीकरण मोठ्या स्तरावर करण्यात आल्याने चित्रपटातील संपूर्ण टीमला विशेष मेहनत घ्यावी लागली. ‘मल्हारी’ या गाण्यात बाजीराव पेशवे यांचे शौर्य आणि विजयी जल्लोष दाखवण्यात आलायं. अभिनेता रणवीर सिंगने कित्येक दिवसांच्या सरावानंतर गाण्याचे चित्रण पाच दिवसांत पूर्ण केले. ‘मल्हारी’ विजयगीताचे बोल ‘दुश्मन ची वाट लावली’ हे आहेत आणि हे गीत बाजीराव पेशवे शत्रूवर विजय मिळवून जेव्हा घरी येतात त्यानंतर चित्रीत करण्यात आलेय. ‘मल्हारी’ गीतास विशाल ददलानीने गायले असून, गणेश आचार्यने त्याचे नृत्य दिग्दर्शन केलेयं. चित्रपटातील इतर गाण्यांप्रमाणे या गाण्यासही तितकीचं प्रशंसा मिळते की ‘पिंगा’ गाण्याप्रमाणे यासही लोकांच्या टीकेस सामोरे जावे लागेल हे लवकरच कळेल.
इरॉस इंटरनॅशनल आणि संजय लीला भन्साळी निर्मित ‘बाजीराव मस्तानी’ १८ डिसेंबर रोजी सर्व चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.
संग्रहित लेख, दिनांक 1st Dec 2015 रोजी प्रकाशित
पाहाः ‘बाजीराव मस्तानी’मधील ‘मल्हारी’ गाणे
'मल्हारी' या गाण्यात बाजीराव पेशवे यांचे शौर्य आणि विजयी जल्लोष दाखवण्यात आलायं.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 01-12-2015 at 10:35 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajirao mastani watch ranveer singh in this victory anthem malhari