सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांची नात जनाईचा अभिनेता रणवीर सिंग बरोबरचा सेल्फी सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. जनाई तिच्या आजीप्रमाणेच गायिका आहे. तिने नुकतेच ‘सिक्स पॅक’ या तृतीयपंथीयांच्या बँडसोबत एका गाण्याचे चित्रीकरण केले. याचवेळी तिची गाठ रणवीर सिंगशी पडली आणि या दोघांनी सेल्फी काढला.