"आम्ही महिनाभर…" 'बिग बॉस' स्क्रिप्टेड म्हणणाऱ्यांना महेश मांजरेकरांचे स्पष्ट शब्दात उत्तर | Bigg boss marathi 4 is scripted or not here what mahesh manjrekar said nrp 97 | Loksatta

“आम्ही महिनाभर…” ‘बिग बॉस’ स्क्रिप्टेड म्हणणाऱ्यांना महेश मांजरेकरांचे स्पष्ट शब्दात उत्तर

अनेकदा ‘बिग बॉस’चा शो स्क्रिप्टेड आहे अशी टीका केली जाते. नुकतंच या टीकांवर महेश मांजरेकरांनी उत्तर दिले आहे.

“आम्ही महिनाभर…” ‘बिग बॉस’ स्क्रिप्टेड म्हणणाऱ्यांना महेश मांजरेकरांचे स्पष्ट शब्दात उत्तर

छोट्या पडद्यावरील सर्वांचा लाडका आणि वादग्रस्त कार्यक्रम म्हणून ‘बिग बॉस’ला ओळखले जाते. हा शो कायमच लोकप्रिय असतो. मराठी ‘बिग बॉस’ सुरु झाल्यापासून हा शो कायमच सुपरहिट ठरला आहे. ‘बिग बॉस’च्या स्पर्धकांमधील राडे, नवनवीन टास्क, मैत्री आणि होणारे वाद यामुळे हा शो कायमच लोकप्रिय ठरतो. ‘बिग बॉस’चे तीनही पर्व हिट ठरल्यानंतर येत्या २ ऑक्टोबरपासून चौथे पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनेकदा ‘बिग बॉस’चा शो स्क्रिप्टेड आहे अशी टीका केली जाते. नुकतंच या टीकांवर महेश मांजरेकरांनी उत्तर दिले आहे.

‘बिग बॉस मराठी’चे चौथे पर्व सज्ज झाले आहे. यंदा या कार्यक्रमाची थीम ‘ALL IS WELL’ अशी असणार आहे. केवळ मराठीच नाही तर हिंदीमध्येही आपल्या कौशल्यपूर्ण दिग्दर्शनाने आणि अभिनयाने वेगळी छाप सोडणारे, मराठी माणसांना कायम आपलेसे वाटणारे महेश मांजरेकर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहेत. मराठी टेलिव्हीजनवरचा सगळ्यात भव्य रिअॅलिटी शो म्हणून ‘बिग बॉस मराठी’कडे पाहिले जात आहे. नुकतंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांना ‘बिग बॉस’च्या शोबद्दल अनेक प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी ‘बिग बॉस’चा शो स्क्रिप्टेड असतो का? याबद्दल भाष्य केले.
आणखी वाचा : “मी बिग बॉसचा प्रत्येक एपिसोड…” महेश मांजरेकरांचे स्पष्ट शब्दात उत्तर

महेश मांजरेकर नेमकं काय म्हणाले?

‘बिग बॉस’ हा शो स्क्रिप्टेड असतो असे अनेकदा बोललं जातं. यामुळे या कार्यक्रमावर अनेकदा टीकाही केली जाते. मात्र नुकतंच महेश मांजरेकरांनी यावर स्पष्ट शब्दात उत्तर दिले. यावेळी ते म्हणाले, “मी ‘बिग बॉस’साठी काहीही तयारी केलेली नाही. हीच माझी तयारी असते. मी ठरवून काहीच करत नाही. स्पर्धक जसे वागतात त्यावरच माझी रिअॅक्शन असते. ‘बिग बॉस’चा होस्ट म्हणून अनुभव फारच चांगला आहे. माझ्यासाठी ‘बिग बॉस’ची ती संपूर्ण प्रक्रिया फार आनंद देणारी असते. मला ‘बिग बॉस’ हा शो इतका भयंकर आवडतो. मी ‘बिग बॉस’ होस्ट करेपर्यंत कधीही ‘बिग बॉस’ पाहिला नव्हता. त्यानंतर मी तो होस्ट करायचं म्हणून तो पाहिला. हा फारच चांगला शो आहे.
आणखी वाचा : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात कोणते स्पर्धक बघायला आवडतील? महेश मांजरेकर म्हणाले “गौरव मोरे, शिवाली…”

अनेकजण मला येऊन विचारतात की हा शो स्क्रिप्टेड असतो का? त्यावर मी त्यांना सांगू इच्छितो की, एखादे नाटक करताना आम्ही महिनाभर सराव करतो. इथे २४ तास आणि १०० दिवस…. म्हणजे किती महिने सराव करावा लागेल. बरं मला कितीतरी स्पर्धकांनी सांगितलंय की आम्ही असं वागायचं, हे करायचं असे ठरवून जातो, पण ते होत नाही. त्याचं कारण म्हणजे ज्या काही घटना आत घडतात, त्यावर तिकडे प्रतिक्रिया उमटते. मी पूर्ण आठवडा तो शो पाहतो आणि त्यानंतर मला समजतं की कोणाची काय वाजवायची असते”, असे महेश मांजरेकर म्हणाले.

आणखी वाचा : अमेय वाघ आणि सुमीत राघवनच्या वादावर अखेर पडदा, कारण आले समोर

दरम्यान आता या ‘बिग बॉस’ मराठीमध्ये कोण कोणते कलाकार असणार, पुन्हा तोच राडा होणार का? मैत्री आणि प्रेमाचे वारे वाहणार का? याची चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आहे. येत्या २ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस’ मराठीचे चौथे पर्व सुरु होणार आहे. त्यातच ‘बिग बॉस’ मराठी’मुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन होणार असल्याचे दिसत आहे. यात सहभागी होणारे स्पर्धक कोण असणार याबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
दोन लग्न, चौथ्याच व्यक्तीशी अफेअर अन्…; बिपाशा बासूच्या नवऱ्याला पूर्वाश्रमीच्या पत्नीने मारली होती कानाखाली

संबंधित बातम्या

‘द काश्मीर फाइल्स’ला ‘व्हल्गर’ आणि ‘प्रोपगंडा’ म्हणणाऱ्या लॅपिड यांनी मागितली माफी; म्हणाले, “काश्मिरी पंडितांचा…”
“आरडाओरड करणाऱ्या लोकांमध्ये तो कायम…” रवीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर मराठी लेखकाची तिरकस पोस्ट
“मी खरा आहे कारण…” मानसी नाईकच्या नवऱ्याची ‘ती’ पोस्ट चर्चेत
हॉलिवूडमधील महागडा घटस्फोट! अभिनेत्री किम कार्दशियनला कान्ये वेस्ट महिन्याला देणार तब्बल ‘इतके’ कोटी रुपये
नोरा फतेहीला डान्सरचा चुकीच्या पद्धतीने स्पर्श; व्हिडीओ व्हायरल

व्हिडिओ

ताज्या बातम्या
रायगडमध्ये भात लागवडक्षेत्रात घट; तांदूळ उत्पादनात मात्र वाढ, प्रति हेक्टरी अडीच टन धान्य
शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ ; प्रस्ताव मंजुरीसाठी वित्त विभागाकडे
अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे क्रिकेट सल्लागार समितीवर
महानगर क्षेत्रात लवकरच आपला दवाखाना ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
FIFA World Cup 2022: टय़ुनिशियाविरुद्ध अपात्र गोलबाबत फ्रान्स फुटबॉल महासंघाची तक्रार