बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आज त्याचा ५१ वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि कायम चर्चेत असलेल्या कपलपैकी एक म्हणजे सैफ आणि करीना. करीना कपूर आणि सैफ अली खान त्यांच्या खासगी आयुष्यामुळे कामयच चर्चेत असतात. करीना आणि सैफचं नातं अगदी घट्ट आहे. असं असलं तरी तुम्हाला माहित आहे का एका सिनेमाच्या प्रमोशनवेळी करीनाचा ड्रेस पाहून सैफ अली खान तिच्यावर चांगलाच भडकला होता.
अभिनेत्री करीना कपूर ‘विरे दी वेडिंग’ सिनेमाच्या एका प्रमोशनसाठी तयार झाली होती. यावेळी करीनाचा ड्रेस पाहून सैफ चांगलाच भडकला. एवढचं नाही तर त्याने करीनाला कपडे बदलून दुसरा ड्रेस घालण्यास सांगितलं होतं. करीना कपूरने स्वत: एका मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला होता.
२०१८ सालात करीना ‘वीरे दी वेडिंग’ मध्ये झळकली होती. तैमूरच्या जन्मानंतर करीनाने या सिनेमातून कमबॅक केलं होतं. या सिनेमाच्या एका म्युझिक इव्हेंटला करीना एका ब्लॅक ड्रेसमध्ये पोहलली होती. ब्लॅक करलचा स्कर्ट आणि टॉप तसचं त्यावर ओव्हर कोट असा करीनाचा ग्लमरस लूक इव्हेंटमध्ये सर्वाचं लक्ष वेधून घेत होता. यावेळी अनेकांनी करीनाचं कौतुक केलं. मात्र जेव्हा करीना घरी पोहचली तेव्हा सैफ मात्र तिचा ड्रेस पाहून नाराज झाला होता.
हे देखील वाचा: करीनासोबत लग्नाच्या दिवशी सैफने पूर्वाश्रमीची पत्नी अमृताला लिहिले होते पत्र!
एका रेडिओ स्टेशनवर दिलेल्या मुलाखतीत करीनाने इव्हेंटनंतर घडलेला किस्सा शेअर केला होता. ती म्हणाली, “ब्लॅक ड्रेसमध्ये मी घरी पोहचले तेव्हा सैफ अली खानचा चेहरा पाहण्यासारखा होता. तो म्हणाला, हे काय घातलंय. जा आणि आताच्या आता हे कपडे बदल आणि काही तरी साधे कपडे घालून ये.” करीनाच्या ड्रेसवर सैफने अशी प्रतिक्रिया दिल्यांचं ती म्हणाली.
यावर करीनाने सैफला उलट सवाल विचारला होता. ती म्हणाली, “या ड्रेसमध्ये काय आहे. तू छान दिसतेयस असं सगळे म्हणत होते.” असं म्हणत करीनाने इव्हेंटचे काही फोटो सैफ अली खानला दाखवले. हे फोटो पाहून मात्र करीना सुंदर दिसत असल्याचं सैफ म्हणाला होता. करीना कपूरने स्वत: हा संपूर्ण किस्सा शेअर केला होता.