बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलने सिनेमांमधून आपली छाप पाडल्यानंतर काही काळ बॉलिवूडमधून मोठा ब्रेक घेतला. असं असलं तरी बॉबी देओलने ‘आश्रम’ या वेब सिरीजमधून डिजीटल विश्वास पदार्पण करत प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली. ‘आश्रम’ या वेब सीरिजमधून बॉबी देओल एका वेगळ्यात रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला. या शोमध्ये बॉबी देओलने साकारलेली व्हिलनची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली.

‘आश्रम’ वेब सीरिजचे दोन्ही सिझन चांगलेच लोकप्रिय ठरले. एका मुलाखतीत बॉबी देओल म्हणाला होती, “माझ्या आईच्या अनेक मैत्रीणींनी मला फोन केले. त्या म्हणाल्या आश्रममध्ये जरी तू व्हिलनची भूमिका केली असली तरी पडद्यावर मात्र तुझा अभिनय अगदी दमदार दिसतोय.” असं बॉबी म्हणाला. बॉबी देओल लवकरच ‘लव हॉस्टल’ सिनेमामधून झळकणार आहे. महत्वाचं म्हणजे ‘लव्ह हॉस्टल’मध्ये देखील बॉबी व्हिलनची भूमिका साकारत आहे.

हे देखील वाचा: राधिका आपटेचा ‘तो’ न्यूड फोटो पुन्हा व्हायरल, सोशल मीडियावर #BoycottRadhikaApte ट्रेंड

एका मुलाखती बॉबी त्याच्या भूमिकांविषयी सांगताना म्हणाला, ” मला वाटतं मी इंटस्ट्रीचा व्हिलन झालो आहे.” यावर बॉबीला त्याला टायपोकास्ट होण्याती भिती नाही का? असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला, “येणाऱ्या काळात तुम्ही मला सिनेमांमध्ये आणि वेब शोमध्ये व्हिलनच्या भूमिकेत पाहणार आहात. मात्र या सर्व भूमिका वेगवेगळ्या स्वरुपाच्या असतील. जोवर सर्व पात्र किंवा भूमिका वेगवेगळ्या धाटणीच्या आहेत तोवर मला काहीच प्रॉब्लेम नाही.” असं बॉबी म्हणाला.

हे देखील वाचा: “तुझ्या मुलाचं नाव औरंगजेब ठेव”; नेटकऱ्याला स्वरा भास्कर म्हणाली “मला सुलेमान आवडतं”

शंकर रमन दिग्दर्शित ‘लव्ह हॉस्टेल’ या आगामी सिनेमात बॉबी देओलसह विक्रांत मेस्सी आणि सान्या मल्होत्रा मुख्य भूमिकेत झळकतील.