bollywood actor aamir khan brother faisal khan on sushant singh rajput death | Loksatta

आमिरचा भाऊ फैजल खानचं सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत मोठं वक्तव्य, म्हणाला “त्याचा खून…”

फैजल खानने नुकतीच ‘टाइम्स नाऊ नवभारत’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबद्दल केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

amir khan brother faisal khan on sushant singh rajput death
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे फैजल खान पुन्हा चर्चेत आला आहे.

बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा भाऊ फैजल खान सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. फैजलला ‘मेला’ या चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली होती. या चित्रपटात आमिर खानसह त्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याने ‘फॅक्ट्री’ चित्रपटातून दिग्दर्शनात पाऊल ठेवलं. ‘बिग बॉस हिंदी’च्या १६ व्या पर्वाची ऑफर नाकारल्यानंतर तो पुन्हा चर्चेत आला होता. आता दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत त्याने केलेल्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

फैजल खानने नुकतीच ‘टाइम्स नाऊ नवभारत’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने बॉक्स ऑफिस, बॉयकॉट बॉलिवूड, कौटुंबिक वाद आणि बिग बॉस या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. मुलाखतीत त्याला अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबतही प्रश्न विचारण्यात आले. यावर फैजलने उत्तर देत मोठं वक्तव्य केलं आहे.

हेही वाचा >> नागा चैतन्य-समांथाच्या घटस्फोटावर नागार्जुन यांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले “माझा मुलगा आता…”

फैजल म्हणाला, “सुशांत सिंह राजपूतचा खून करण्यात आला आहे. त्याची केस पुन्हा सुरू होईल की नाही, हे येणारा काळच सांगेल. याचा तपास अजून सुरू आहे. काही वेळेस सत्य समोर येत नाही. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूमागचं सत्य लवकर सगळ्यांसमोर येऊ दे, यासाठी मी प्रार्थना करेन”. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूबाबत केलेल्या वक्तव्यामुळे फैजल पुन्हा चर्चेत आला आहे.

हेही वाचा >> “बाबूजी जरा धीरे…” बिग बॉस फेम अभिनेत्रीने शेअर केलेला रस्त्यावरील खड्ड्यांचा व्हिडीओ चर्चेत

‘मेला’ चित्रपटातून प्रसिद्धी मिळूनही फैजल कौटुंबिक वादामुळे बॉलिवूडपासून दूर राहिला. त्याने आमिर खानवरही आरोप केले होते. फैजलने ‘चिनार’, ‘दास्तान’ या चित्रपटांत साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या होत्या. याबरोबरच त्याने ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटातही काम केलं आहे. सध्या फैजल अनेक चित्रपटात छोट्या-मोठ्या भूमिका साकारताना दिसत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-09-2022 at 13:43 IST
Next Story
“कन्नड चित्रपटसृष्टी संपुष्टात येणार होती पण…” महेश मांजरेकर यांचं मोठं वक्तव्य