बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘तूफान’ या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाच्या यशानंतर फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा ही दमदार जोडी ‘तुफान’च्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस आली. फरहान अख्तर हा नेहमीच त्याच्या फिटनेसकडे लक्ष देत असतो. त्याच्या तुफानमधील भूमिकेसाठी फरहान अख्तरला त्याच्या शरीरात बरेच बदल करावे लागले होते.

फरहान अख्तर सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. तो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊटवरून त्याच्या चाहत्यांशी सतत संपर्कात असतो.  तो त्याच्या कामाबद्दलची माहीत आणि अपडेट पोस्टद्वारे त्याचा फॅन्सना कळवतो. फरहानने नुकतीच एक पोस्ट त्याच्या सोशाल मीडियावर शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हयारल होताना दिसत आहे.

फरहान अख्तरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याने त्याच्या १८ महिन्यांची मेहनत दाखवली आहे. त्याला ‘तुफान’मधील  भूमिकेसाठी वजन वाढवायचे होते. फरहान अख्तरने अज्जी आलीच्या भूमिकेसाठी तब्बल १६ किलो वजन वाढवले होते आणि आता त्याने ९ किलो वजन कमी केले असल्याचे या पोस्टमधून दिसून येत आहे.

फरहानने शेअर केलेल्या पोस्ट खाली त्याने “अज्जू म्हणजेच अज्जू अली म्हणजेच तुफान वेगवेगळ्या रूपात. माझा प्रवास. १८ महिन्यांचे कष्ट, घामाच्या प्रत्येक थेंबाची किंमत, प्रत्येक घसा स्नायू आणि प्रत्येक पौंड कामावल आणि गमावला.”असे कॅप्शन देखील दिले आहे. फरहानने  शेअर केलेल्या या फोटोत त्यानी ३ फोटो एकत्र केले असून खाली त्याच्या वजनात होणारे बदल देखील दाखवले आहेत. त्याने त्याच्या या मेहेनतीचे श्रेय त्याच्या जिम ट्रेनर्सना देताना दिसला आहे.

फरहान अख्तरने याआधी देखील त्याच्या ट्रेनर्स सोबत एक पोस्ट इन्स्टावर शेअर केली होती. त्याने तूफानसाठी जी मेहेनत घतेली होती त्यासाठी त्याच्या टीमचे आभार मानले होते. “बॉक्सर आणि बॉक्सिंगच्या मागे असलेली टीम. तूफानमध्ये जे दिसते ती या सगळ्यांची मेहेनत आहे.” अशा अश्याचे कॅप्शन दिले होते.

दरम्यान ‘तूफान’या चित्रपटात फरहान बरोबरच मृणाल ठाकूर,परेश रावल, सुप्रिया पाठक कपूर, हुसेन दलाल, डॉ. मोहन आगाशे, दर्शन कुमार आणि विजय राझ या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश ओमप्रकाश यांनी केले आहे. हा चित्रपट १६ जुलै रोजी अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला असून हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजी दोन भाषांमध्ये तुम्ही पाहू शकतात.