Genelia Deshmukh Video : जिनिलीया देशमुख आपलं करिअर सांभाळून नेहमीच कुटुंबाला प्राधान्य देताना दिसते. शूटिंगमधून ब्रेक मिळाला की, अभिनेत्री कुटुंबीयांसह वेळ घालवताना दिसते. यासह प्रत्येक सणासुदीला सगळे देशमुख कुटुंबीय लातूरच्या त्यांच्या मूळ घरी एकत्र येतात आणि आनंदाने वटपौर्णिमा, गणेशोत्सव, दिवाळीसारखे सण साजरा करतात.

आज धनत्रयोदशीच्या निमित्ताने जिनिलीयाचं देशमुख कुटुंबातील एका खास व्यक्तीने औक्षण केलं आहे. ती खास व्यक्ती म्हणजे दिवीयाना देशमुख. दिवीयाना ही रितेशचे बंधू धिरज व वहिनी दीपशिखा देशमुख यांची मुलगी आहे.

जिनिलीयाने दिवीयानासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री लिहिते, “ही आमच्या घरची गोड मुलगी; जिच्यावर माझं मनापासून प्रेम आहे. फुटबॉल खेळते, तिला नेहमीच वेगळं काहीतरी करायला आवडतं. आज माझं औक्षण केलं… खरंच, तिला माझं औक्षण करताना पाहून माझे डोळे पाणावले होते…खूपच भरून आलं. आय लव्ह यू दिवू. मला तुझा खूप खूप अभिमान आहे…तू कल्पनाही करू शकत नाहीस इतका… धिरज व दीपशिखा हे खरे तुमचे संस्कार आहेत.”

जिनिलीयाने शेअर केलेल्या व्हिडीओच्या शेवटी अभिनेत्री दिवीयानाला प्रेमाने जवळ घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. जिनिलीयाचा व्हिडीओ शेअर करत दिपशिखाने, “हा व्हिडीओ पाहून मी सुद्धा भारावून गेलेय वहिनी” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, रितेश-जिनिलीयाच्या मुलांना सुद्धा फुटबॉलची प्रचंड आवड आहे. देशमुख कुटुंबीय दिवीयानाला देखील तिच्या प्रत्येक फुटबॉल टुर्नामेंटसाठी चिअर करताना दिसतात.

https://images.loksattaimg.com/2025/10/AQMpI1NSBFO9NUPIU1hZwzhaDImg8j8fMzuedQa_u7jK1ezSafVEsV8reatXIbKgUGVJ3iXUvmJkUC1PqZ78kv_2tzaIjXPVhi9jRdc.mp4

जिनिलीयाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, काही महिन्यांपूर्वी ती आमिर खानच्या ‘सितारें जमीन पर’ या सिनेमात झळकली होती. आता सध्या अभिनेत्री रितेशसह ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. या सिनेमाची निर्मिती सुद्धा जिनिलीयाने केली आहे. हा भव्यदिव्य चित्रपट पुढच्या वर्षी मे महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.