अभिनेत्री राखी सावंत सोशल मीडियावर सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. यापूर्वी ती तिचे वैयक्तिक आयुष्य आणि आदिल खान दुर्रानीसोबतच्या लग्नामुळे चर्चेत होती. आदिलसोबत लग्न केल्यानंतर तिने इस्लाम धर्म स्वीकारला आणि राखीवरून फातिमा असे नाव बदलले. तिचा आदिलसोबत वाद असला तरी आपण मुस्लिम धर्माचे पालन करणार असल्याचे तिने आधीच स्पष्ट केले आहे. मात्र, ती अनेकदा युजर्सच्या निशाण्यावर असते. नमाज अदा केल्याने तिला अनेकदा ट्रोल केले जाते. राखी पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.
राखी सावंतने आधीच सांगितले होते की, आदिलने तिच्यासोबत गैरवर्तन केले तरी ती नक्कीच रोजा पाळेल. आता पवित्र रमजान महिना सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत राखीने उपवासही ठेवला आहे. दरम्यान, अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तिने एका इफ्तार पार्टीत आपला उपवास सोडला. या पार्टीत तिचे मित्रही उपस्थित होते.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये राखी बुरखा परिधान करून हातात निकाब धरलेली दिसत होती, मात्र तिच्या हातातून निकाब खाली पडतो. तर, आणखी एका व्हायरल व्हिडिओमध्ये राखी जमिनीवर बसली होती आणि तिच्यासमोर विविध प्रकारची फळे ठेवण्यात आली होती. उपवास सोडण्यापूर्वी राखीने तिच्या मैत्रिणींसोबत अल्लाची पूजा केली आणि खजूर खात उपवास सोडला. मात्र, राखीची ही स्टाईल युजर्सना आवडली नाही आणि त्यांनी तिला प्रचंड ट्रोल केले.
हेही वाचा- Video: टॉयलेट पेपरपासून ड्रेस बनवणाऱ्या उर्फी जावेदवर नेटकऱ्यांचा संताप, म्हणाले “रमजान महिन्यात…”
राखीला ट्रोल करत एका यूजरने लिहिले की, ‘तिला प्रत्येक गोष्टीत प्रसिद्धी हवी आहे. त्याचवेळी दुसर्या युजरने लिहिले की, ‘तुम्ही कितीही नौटंकी केली तरी त्यांना कधीच समाधान वाटत नाही.’ एकाने लिहिले, ‘नौटंकीबाज’. एका यूजरने लिहिले, ‘अमर, अकबर, अँथनी.’ त्याचवेळी दुसऱ्या यूजरने लिहिले की, ‘ती कधी कधी हिंदू असते. कधी ख्रिश्चन तर कधी मुस्लिम. एकाने लिहिले, ‘मला वाटते की तुम्ही मुखवटाचा आदर करत नाही, त्यामुळे हे सर्व नाटक करून काही होणार नाही. तुम्हाला आशीर्वाद मिळणार नाहीत.