after drishyam 2 ajay devagn reunite with rohit shetty for singham movie sequel | Loksatta

‘दृश्यम २’ नंतर अजय देवगणच्या ‘सिंघम’ची चर्चा; चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अजय देवगण व रोहित शेट्टी ‘सिंघम’ चित्रपटाच्या सिक्वेलसाठी पुन्हा येणार एकत्र

‘दृश्यम २’ नंतर अजय देवगणच्या ‘सिंघम’ची चर्चा; चित्रपटाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
सिंघम चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (फोटो: तरण आदर्श/ इन्स्टाग्राम)

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला ‘दृश्यम २’ हा चित्रपट १८ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला. उत्कंठावर्धक कथा, कलाकारांचा दमदार अभिनय, क्लायमेक्स व एकामागोमाग येणारे ट्विस्ट या सगळ्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. ‘दृश्यम २’ला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहात गर्दी करत आहेत.

‘दृश्यम २’ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदोड सुरू असतानाच आता अजय देवगणच्या ‘सिंघम’ चित्रपटाच्या सिक्वेलसाठी चाहते उत्सुक आहेत. ‘सिंघम’चा सिक्वेलही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सिनेअभ्यासक तरण आदर्श यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली आहे. अजय देवगणचा फोटो पोस्ट करत ‘सिंघम’ चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

हेही वाचा>> गरोदर असल्याच्या चर्चांवर मलायका अरोराने सोडलं मौन, म्हणाली…

हेही वाचा>>२१व्या वर्षी लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याचा खात्मा करणाऱ्या मुलीची गोष्ट मोठ्या पडद्यावर; मुख्य भूमिकेत दिसणार ‘ही’ अभिनेत्री

“अजय देवगण व रोहित शेट्टी सिंघम चित्रपटाच्या सिक्वेलसाठी पुन्हा एकत्र येणार आहेत. अजय देवगण-रोहित शेट्टी यांची यशस्वी जोडी पुन्हा एकत्र येणार आहे. सध्या अजय देवगण भोला चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. त्यानंतर आम्ही सिंघमच्या सिक्वेलवर काम सुरू करणार असल्याचं रोहित शेट्टीने सांगितलं आहे”, असं तरण आदर्श यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> तेजस्विनी लोणारी घराबाहेर पडल्यानंतर अमृता धोंगडे ढसाढसा रडली, नेटकरी म्हणतात “एवढं बदनाम करुन…”

‘सिंघम’ चित्रपटाच्या पुढील भागाचं नाव ‘सिंघम अगेन’ असं असणार आहे. २०११ साली ‘सिंघम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होती. त्यानंतर २०१४ साली या चित्रपटाचा दुसरा भाग ‘सिंघम रिटर्न्स’ प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता या चित्रपटाचा तिसऱ्या भागातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी रोहित शेट्टी व अजय देवगण सज्ज आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 17:40 IST
Next Story
२१व्या वर्षी लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याचा खात्मा करणाऱ्या मुलीची गोष्ट मोठ्या पडद्यावर; मुख्य भूमिकेत दिसणार ‘ही’ अभिनेत्री