गुजरातमधील जामनगर इथं अनंत अंबानींचा प्री-वेडिंग सोहळा पार पडतोय. तीन दिवसाच्या सोहळ्याचा आज शेवटचा दिवस आहे. पहिल्या दिवशी रिहानाने परफॉर्म करत जगभरातून आलेल्या पाहुण्यांचं मनोरंजन केलं, तर दुसऱ्या दिवशी बॉलीवूडकरांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली. पण दोन्ही दिवस सिनेसृष्टीतील आघाडीचे बच्चन कुटुंब या कार्यक्रमात दिसले नाही. आता त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे.

अमिताभ बच्चन व त्यांचे कुटुंबीय आज तिसऱ्या व अखेरच्या दिवशी अनंत अंबानी व राधिका मर्चेंट यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला हजेरी लावतील. यासाठी अमिताभ बच्चन, त्यांच्या पत्नी जया बच्चन, त्यांची मुलगी श्वेता बच्चन व नातू अगस्त्य नंदा हे एअरपोर्टवर पोहोचले. तर दुसऱ्या कारमध्ये अभिषेक, त्याची पत्नी ऐश्वर्या आणि मुलगी आराध्या पोहोचल्याचं पाहायला मिळालं. बच्चन कुटुंबीय एकत्र जामनगरला गेले आहेत.

गरोदर दीपिकाचा पती रणवीरबरोबर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

बच्चन कुटुंबातील ही सगळी मंडळी आज शेवटच्या दिवशी जात असली तरी अमिताभ यांची नात व श्वेताची लेक नव्या नवेली नंदा मात्र जामनगरमध्येच आहे. तिने आधीच या सोहळ्याला हजेरी लावली होती. तिचा सुहाना खानबरोबरचा फोटोही सोशल मीडियावर पाहायला मिळाला.

धोनीला आकाश अंबानीने शिकवलं दांडिया खेळायला, मग थाला अन् ब्राव्होची जोरदार जुगलबंदी, व्हिडीओ पाहिलात का?

दरम्यान, जामनगरमध्ये जंगी प्री-वेडिंग कार्यक्रमाचं आयोजन केल्यानंतर अनंत व राधिकाचं लग्न कधी असेल याबाबत लोकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. तर, या जोडप्याचं लग्न १२ जुलै २०२४ रोजी मुंबईमध्ये पार पडणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. लग्न मुंबईत असल्यानेच जामनगरमध्ये असा भव्य प्री-वेडिंग सोहळा आयोजित करण्यात आला.