ankita lokhande shared hot dance video netizen troll her for sexy moves | Loksatta

Video: सोफ्यावर बसून अंकिता लोखंडेचा हॉट डान्स, नेटकरी म्हणतात “पवित्र रिश्ता…”

अंकिता लोखंडेचा डान्स पाहून नेटकरी अवाक, ट्रोल करत म्हणाले…

Video: सोफ्यावर बसून अंकिता लोखंडेचा हॉट डान्स, नेटकरी म्हणतात “पवित्र रिश्ता…”
अंकिता लोखंडेचा डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. (फोटो: अंकिता लोखंडे/ इन्स्टाग्राम)

अभिनेत्री अंकिता लोखंडे जैन कलाविश्वातील लोकप्रिय सेलिब्रिटींपैकी एक आहे. ‘पवित्रा रिश्ता’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अंकिताने अल्पावधीतच मनोरंजनसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. मालिकांबरोबरच अंकिताने चित्रपटांतही काम केलं आहे.

अंकिता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. तिचा चाहता वर्गही फार मोठा आहे. नुकतंच अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती ‘ये एक जिंदगी काफी नही है’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. अंकिताने डान्स करत घरातील लिविंग एरियाची झलक दाखविली आहे. थाय हाय स्लिट ड्रेसमध्ये अंकिताचा हॉट डान्स पाहून चाहतेही अवाक झाले आहेत. अंकिताचा हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा>> Dishyam 2 Box Office Collection: अजय देवगणच्या ‘दृश्यम २’ने पार केला १०० कोटींचा आकडा, सात दिवसांत कमवले ‘इतके’ कोटी

हेही वाचा>> ‘गलवान’चा उल्लेख करत रिचा चड्ढाने केलं ट्वीट, नेटकऱ्यांची fukrey3 बॉयकॉट करण्याची मागणी

अंकिताने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे. एका युजरने कमेंट करत “डान्स हा एक बहाणा आहे. हिला स्वत:चं घर दाखवायचं आहे, बाकी काही नाही” असं म्हटलं आहे. तर दुसऱ्याने “लॅविश घर दाखवण्याची निंन्जा टेकनिक” अशी कमेंट केली आहे. आणखी एका युजरला अंकिताच्या पवित्र रिश्ता मालिकेची आठवण झाली. त्याने कमेंटमध्ये “पवित्र रिश्ता मधील अंकिता जास्त चांगली दिसत होती” असं म्हटलं आहे.

हेही वाचा>> Video: आधी धक्का दिला, मग जोरात ढकललं; विकास सावंत व रोहित शिंदेमध्ये हाणामारी; बिग बॉसने सुनावली जेलमध्ये राहण्याची शिक्षा

अंकिताने पती विकी जैनसह २०२१ मध्ये लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला सुरुवात केली. येत्या १४ डिसेंबरला त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण होत आहे.  

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-11-2022 at 11:27 IST
Next Story
रिचा चड्ढाच्या ‘Galwan says hi!’ ट्वीटवर अक्षय कुमारही संतापला, म्हणाला “आज ते आहेत म्हणून…”