‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाला एकीकडे प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असतानाच दुसरीकडे मात्र या चित्रपटावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी चित्रपटाचे प्रदर्शन थांबवण्याचे आदेश दिले असून तामिळनाडूमध्येही चित्रपटाचे प्रसारण रोखण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर बॉलीवूडमधील काही कलाकार चित्रपटाच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. आता दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी यासंदर्भात ट्वीट केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : श्रद्धा कपूरच्या ब्रिटिश ॲक्सेंटचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, “तू शक्ती कपूर यांची…”

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार रोखण्यासाठी आणि तेथील शांतीपूर्ण वातावरण कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सांगितले. या विरोधात चित्रपटाच्या निर्मात्यांनी बंदी हटविण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि आता दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी ट्वीट करत ‘द केरला स्टोरी’ला पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा : आयुष्याचा जोडीदार म्हणून कसा मुलगा हवा? अमृता देशमुख म्हणाली, ‘हे’ गुण असतील तर…

अनुराग कश्यप हे ट्वीट करत म्हणाले, तुम्ही या चित्रपटाचे समर्थन करा किंवा नका करू, हा चित्रपट प्रोपगंडा असेल किंवा नसेल, यात काही आक्षेपार्ह असो वा नसो, त्यावर बंदी घालणे चुकीचे आहे. तसेच सुधीर मिश्रांच्या ‘अफवाह’ चित्रपटाला समर्थनार्थ अनुराग कश्यप म्हणाले, “तुम्हाला प्रोपगंडाविरोधात लढायचे असेल, तर सोशल मीडियाचा दुरुपयोग कसा केला जातो, समाजातील वातावरण कलुषित कसे होते हे जाणून घेण्यासाठी ‘अफवाह’ चित्रपट बघा, परंतु एखाद्या चित्रपटावर बंदी घालणे चुकीचे आहे.”

‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यावर वादाला सुरुवात झाली होती. टीझर आणि ट्रेलरमध्ये दावा केल्याप्रमाणे केरळमधून ३२ हजार मुली गायब होऊन पुढे आयसिस आणि दहशतवादी संघटनांमध्ये त्यांना सहभागी करण्यात आले. या आकड्याबद्दल अनेकांनी शंका उपस्थित केली. यानंतर निर्मात्यांनी ३२ हजारऐवजी ३ महिलांचा उल्लेख केला. सध्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anurag kashyap reaction on kerala story movie being banned in west bengal and tamilnadu sva 00