संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित अॅनिमल चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत भारतात २०० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. प्रेक्षक चित्रपटाला उत्स्फुर्त प्रतिसाद देत आहेत. चित्रपटाच्या कमाईतही झपाट्याने वाढ होत आहे. या चित्रपटात रणबीर कपूरने मुख्य भूमिका केली आहे. त्याच्या वडिलांची भूमिका अनिल कपूरने केली आहे. या चित्रपटात रश्मिका मंदानासह बॉबी देओलच्या भूमिकाही महत्त्वाच्या आहेत. पण चित्रपटात बॉबीला जास्त स्क्रीन टाइम मिळालेला नाही. याबाबत अभिनेत्याने प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही बॉबीचा स्क्रीन टाइम खूप कमी होता. टीझरमध्ये तर तो शेवटचे काही सेकंदच झळकला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याची भूमिका लहान पण महत्त्वाची असल्याचं उघड झालं. बऱ्याच प्रेक्षकांनी बॉबीची भूमिका लहान असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. बॉबीला चित्रपटात जास्त स्क्रीन टाइम मिळायला हवा होती, अशी चर्चा होत आहे. यावर आता बॉबीने त्याची बाजू मांडली आहे. स्क्रीन टाइम कमी असल्याची कल्पना आधीच होती, असं बॉबीने सांगितलं.

रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’मध्ये भाव खाऊन गेला ‘हा’ मराठी अभिनेता, अजय-अतुलच्या गाण्यानेही वाढवली रंगत

“माझी भूमिका चित्रपटात फार मोठी नाही, पण ते असं पात्र आहे ज्याला चित्रपटात खूप महत्त्व आहे. चित्रपटात माझे आणखी सीन्स असते तर मला आनंद झाला असता, पण जेव्हा मी चित्रपट साइन केला तेव्हाच मला कळलं होतं की माझी भूमिका खूप लहान असेल. खरं तर माझ्या आयुष्यातील या क्षणी संदीपने मला ही भूमिका साकारण्याची संधी दिली याबद्दल मी देवाचा आभारी आहे. मला माहित होतं की मला चित्रपटासाठी फक्त १५ दिवस काम करायचं आहे आणि संपूर्ण चित्रपटात मी असणार नाही. पण मला खात्री होती की लोक यात माझं काम पाहतील, पण मला ते इतकं प्रेम देतील, माझं इतकं कौतुक करतील असं मला कधीच वाटलं नव्हतं. मिळणार प्रेम हे खूप चांगलं आणि आश्चर्यकारक आहे,” असं बॉबी म्हणाला.

‘अ‍ॅनिमल’च्या OTT रिलीजबद्दल नवी अपडेट; वाचा कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार रणबीरचा चित्रपट

“लोकांना माझं पात्र खूप आवडलं आणि ते त्याचं कौतुकही करत आहेत. लोकांकडून माझ्या कामाचं केलेलं कौतुक, माझ्या पात्राला दिलेलं प्रेम भारावून टाकणार आहे. लोकांना माझं काम आणखी पाहायचं आहे, हे पाहून मला आनंद होतोय,” असंही बॉबीने नमूद केलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bobby deol reacts on his limited screen time in animal hrc