बॉलीवूडमध्ये अनेक कलाकारांना चित्रपटांची कोणतीही पार्श्वभूमी नसताना काम मिळालं. काहींना मुख्य भूमिका ऑफर झाल्या आणि नंतर यशही मिळालं. असाच एक अभिनेता आहे ज्याला मॉडेलिंग करताना चित्रपट करायची संधी मिळाली, त्याचा चित्रपट हिटदेखील झाला पण त्याला नंतर त्याने एकापाठोपाठ अनेक फ्लॉप चित्रपट दिले आणि मग तो सिनेसृष्टीपासून दूर गेला. हा अभिनेता कोण आहे व काय करतो ते जाणून घेऊयात.
तुम्ही बिपाशा बासूचा (Bipasha Basu) ‘राज’ चित्रपट पाहिला असेल, त्यातील मुख्य अभिनेत्याबद्दल आम्ही बोलत आहोत. या अभिनेत्याचं नाव डिनो मोरिया (Dino Morea) आहे.
मॉडेलिंग करताना मिळाली ऑफर
डिनो मोरियाने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. एका फॅशन कंपनीसाठी मॉडेलिंग करताना त्याला त्याच्या पहिल्या चित्रपटाची ऑफर मिळाली. त्याने रिंकी खन्नाबरोबर ‘प्यार में कभी कभी’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट चांगला चालला नाही. मात्र, बिपाशा बासूबरोबरचा ‘राज’ हा त्याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. या चित्रपटाने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली.
डिनो मोरियाचे फ्लॉप चित्रपट
Dino Morea Career: डिनो मोरियाला करिअरच्या सुरुवातीला यश मिळालं, पण तो ते स्टारडम टिकवू शकला नाही. ‘गुनाह’, ‘बाज: अ बर्ड इन डेंजर’, ‘Ssssh…, इश्क है तुमसे’, ‘प्लॅन’, ‘इन्साफ: द जस्टिस’, ‘रक्त: व्हॉट इफ यू कॅन द फ्युचर’, ‘चेहरा’ ‘हॉलिडे’, ‘दस कहानी’ आणि ‘देहा’सह त्याचे जवळपास २० चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्याने बॉलीवूड सोडले. २०२१ मध्ये त्याने ‘द एम्पायर’ वेब सीरिजमध्ये काम केलं.
डिनो मोरियाचे प्रॉडक्शन हाऊस
Dino Morea business: त्याने अभिनयातून ब्रेक घेतला आणि २०१२ मध्ये एमएस धोनी बरोबर ‘कूल मॉल’ नावाची कंपनी सुरू केली. त्याने २०१३ मध्ये ‘क्लॉकवाइज फिल्म्स’ हे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस देखील उघडले आणि नंतर त्याच्या बॅनरखाली ‘जिस्म २’ चित्रपटाची निर्मिती केली.
लोकप्रिय गायक जस्टिन बीबर झाला बाबा, बाळाचा फोटो शेअर करून जाहीर केलं नाव
डिनो मोरियाची ज्यूस कंपनी
डिनोने मिथिल लोढा व राहुल जैन यांच्याबरोबर मिळून कोल्ड-प्रेस्ड ज्यूस ब्रँड ‘द फ्रेश प्रेस’ची स्थापना केली. २०१८ मध्ये व्यवसाय सुरू केल्यानंतर ब्रँडचे ३६ आउटलेट्स आहेत. ब्रँडने आपली बाजारपेठ मजबूत करण्यासाठी पीव्हीआर आयनॉक्स आणि रिलायन्सबरोबर भागीदारी केली. सध्या ही कंपनी गुजरात, दिल्ली, राजस्थान यासारख्या भारतातील विविध राज्यांमध्ये व्यवसायाचा विस्तार करण्याची योजना आखत आहे.
डिनो मोरियाची नेट वर्थ
मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिनो मोरियाची एकूण संपत्ती ८२ कोटी रुपये आहे.
© IE Online Media Services (P) Ltd