आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे, वेगळ्या अंदाजामुळे, स्टाइलमुळे ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ नेहमी चर्चेत असतात. त्यांची स्टाइल चाहत्यांना खूप आवडते. सध्या जॅकी श्रॉफ यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतं आहे. या व्हिडीओमधील जॅकी श्रॉफ यांची कृती पाहून नेटकरी भडकले आहेत. त्यांना ट्रोल करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जॅकी श्रॉफ यांचा व्हायरल व्हिडीओ ‘इंस्टंट बॉलीवूड’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. एका कार्यक्रमासाठी जॅकी श्रॉफ दोन झाडं घेऊन जात होते. तितक्यात त्यांचे चाहते फोटो घेण्यासाठी त्यांच्याकडे धावले. जॅकी श्रॉफ यांनी सगळ्या चाहत्यांबरोबर फोटो काढले. पण यावेळी त्यांनी चाहत्यांना दिलेल्या वागणुकीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

हेही वाचा – शशांक केतकरच्या ‘मुरांबा’ मालिकेचा हिंदीत रिमेक, प्रोमो पाहून म्हणाला, “व्वा आमच्या…”

या व्हिडीओत, जॅकी श्रॉफ फोटो काढण्यात आलेल्या चाहत्याला डोक्यात मारताना दिसत आहेत. तसेच इतरांना दम देताना पाहायला मिळत आहेत. जॅकी श्रॉफ यांनी चाहत्यांना दिलेल्या या वागणुकीवरून नेटकरी भडकले आहेत.

एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “त्याला मारलं का? वेडेत आहेत का?” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “हे खूप चुकीचं आहे. तुम्ही कोणालाही मारू शकत नाही. चाहते तुमचे मित्र किंवा नातेवाईक नाहीत, ज्यांच्याबरोबर तुम्ही मस्ती करालं.” तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “हात लावला तर काय झालं? एवढा गर्व नाही पाहिजे.” चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं, “हे चुकीचं आहे. सामान्य माणसांना हे आदर देत नाहीत.”

हेही वाचा –रिंकू राजगुरुने कुटुंबासह पाहिलं ‘नियम व अटी लागू’ नाटक, संकर्षण कऱ्हाडे म्हणाला, “वचवच, माज, नखरे काही नाही…”

सध्या जॅकी श्रॉफ यांच्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा सुरू आहे. पण काही नेटकरी त्यांना आलेले जॅकी श्रॉफ यांचे चांगले अनुभव शेअर करत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor jackie shroff hit fan video viral netizen angry on him behavior pps