बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलिया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिले जाते. २०१२ मध्ये लग्नगाठ बांधलेल्या या जोडीचं एकमेकांवर अतोनात प्रेम आहे. ते दोघेही सोशल मीडियावर सक्रीय असतात. नुकतंच रितेश देशमुखने पत्नीबरोबरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रितेश देशमुखने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला रितेशने बायकोला सर्व माहिती असते, असे कॅप्शन दिले आहे. या व्हिडीओत ते दोघेही गप्पा मारताना दिसत आहे.
आणखी वाचा : रितेश देशमुखने ‘तो’ व्हिडीओ शेअर केल्यावर संतापली जिनिलिया, म्हणाली “तू आता…”

या व्हिडीओच्या सुरुवातीला जिनिलिया रितेशला “ऐका, मी खूप वाईट आहे ना” असे म्हटले आहे. त्यावर रितेश “तसं तर सर्व माहिती तुला असते, पण तरीही तुला माझ्याकडून ऐकायचं असतं ना”, असे म्हटले आहे. त्यावर जिनिलियाने फारच हटके प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा : “यावर्षीचे देखावे…” पुण्यातील गणपती दर्शनानंतर प्रिया बेर्डेंची पोस्ट, म्हणाल्या “तो योग आज…”

रितेशचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यावर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. या व्हिडीओवर “भाऊ संध्याकाळचे जेवण बाहेर करावे लागणार आज”, अशी कमेंट केली आहे. तर एकाने “जिनिलिया- आज जेवण मिळणार नाही”, असे म्हटले आहे. या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी हसतानाचे इमोजीही शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actor riteish deshmukh share genelia deshmukh comedy video reaction viral nrp