Emraan Hashmi Viral Video: अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये बोल्ड भूमिका केल्यामुळे अभिनेता इम्रान हाश्मी ‘सीरियल किसर’ म्हणून ओळखला जातो. इम्रानने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्रींसोबत किसिंग व रोमँटिक सीन्स केले आहेत. या सिरियल किसरबरोबर एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान एक किस्सा घडला होता. किसिंग सीनमध्ये बॉलीवूड अभिनेत्री इतकी मग्न झाली होती की दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही तिने इम्रानला किस करणे थांबवलं नव्हतं.
या गाण्याचा मेकिंग व्हिडीओ समोर आल्यानंतर स्वत: अभिनेत्रीने हा खुलासा केला होता. २०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘अजहर’ चित्रपटात इम्रान हाश्मीबरोबर अभिनेत्री नरगिस फाखरीने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटातील इतर गाण्यांबरोबरच ‘बोल दो ना जरा’ हे गाणंही सुपरहिट ठरलं होतं. या गाण्याचा मेकिंग व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.
मेकिंग व्हिडीओमध्ये दिसतं की इम्रान आणि नरगिस एक किसिंग सीन शूट करत असतात. जवळपास पाच वेळा हा सीन शूट करण्यात आला होता. दिग्दर्शकाने कट म्हटलं तरी नरगिस इम्रानला किस करतच असते, असं व्हिडीओमध्ये दिसत आहे. ते पाहून सर्वांना धक्का बसतो.
या व्हिडीओमध्ये नरगिस म्हणते, “मला एक सीनदरम्यान इम्रानला पाच वेळा किस करावे लागले होते, त्यासाठी मी जास्त पैसे घेणार होते. कारण हे किसिंग सीन माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नव्हते. किसिंग सीन देताना इम्रानने असा अभिनय केला जणू काही काय घडतंय त्याला कल्पनाच नाही, पण खरं तर तो आनंदी होता.”
पाहा व्हिडीओ-
‘अजहर’ हा चित्रपट माझी क्रिकेटपटू मोहम्मद अजहरुद्दीन यांच्या जीवनावर आधारीत होता. या चित्रपटात इम्रानने मोहम्मद अजहरुद्दीन यांची भूमिका साकारली होती. तर नरगिसने अभिनेत्री संगीता बिजलानीची भूमिका केली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन टोनी डिसूजा आणि अँथनी डिसूजा यांनी केले होते. या चित्रपटात प्राची देसाईनेही काम केलं होतं.