आपल्या देशातील नागरिकांना क्रिकेट आणि सिनेमा या दोन गोष्टींचे विशेष आकर्षण आहे. या दोन्ही क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्यांना आपल्याकडे सेलिब्रिटीचा दर्जा दिला जातो. क्रिकेटच्या मैदानावर नाव कमावणाऱ्या अनेक खेळाडूंनी मनोरंजन विश्वामध्ये नशीब आजमावले आहे. कपिल देव, सुनील गावस्कर, संदीप पाटील यांच्यापासून इरफान पठाण, श्रीसंतपर्यंत बऱ्याचशा क्रिकेटपटूंनी चित्रपटांमध्ये काम केले आहे. या यादीमध्ये आता टीम इंडियाचा गब्बर म्हणजेच शिखर धवनचा समावेश होणार आहे. तो हुमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या ‘डबल एक्सएल’ (Double Xl) या चित्रपटामध्ये झळकणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी पोस्ट करण्यात आला. हा चित्रपट दोन लठ्ठ महिलांच्या कहाणीवर आधारलेला आहे. या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक सतराम रमानी यांनी बॉडी शेमिंग या हास्यास्पद वाटणाऱ्या गंभीर विषयाला हात घातला आहे. झहीर इक्बाल आणि महत राधवेंद्र हे कलाकार या चित्रपटामध्ये सहाय्यक व्यक्तिरेखा साकारणार आहेत. चित्रपटात शिखर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. एका मुलाखतीमध्ये त्याने या नव्या क्षेत्रामध्ये काम करण्याचा अनुभव सांगितला.

आणखी वाचा – “मला रात्री झोप येत नाही तेव्हा…” नवऱ्याविषयी बोलताना कतरिना कैफने उघड केलं बेडरुम सिक्रेट

हिंदुस्तान टाईम्सला मुलाखतीदरम्यान तो म्हणाला, “डबल एक्सएल चित्रपटामध्ये काम करण्यामागे एक हेतू होता. मला या चित्रपटाची कथा फार आवडली. समाजामध्ये शारीरिक सुंदरता महत्त्वाची आहे असे मानले जाते. हा विचार चुकीचा आहे असा संदेश हा चित्रपट देतो. चित्रपटाच्या माध्यमातून हा मौल्यवान संदेश लोकांपर्यत पोहोचणार आहे. याच कारणामुळे मी चित्रपटात काम करायला होकार दिला. चित्रपटाच्या कथेचा सकारात्मक प्रभाव माझ्यावर झाला आहे.”

आणखी वाचा – “धर्माला राज्यकारभारात…” केजरीवालांच्या नोटांवरच्या मागणीला संगीतकार विशालने लगावला टोला

तो पुढे म्हणाला, “चित्रपटामध्ये काम करणं हा माझ्यासाठी खूप नवा अनुभव होता. हा चित्रपट आणि त्यामधील माझी भूमिका लोकांना आवडावी अशी माझी इच्छा आहे. चित्रपटात मी साकारलेले पात्र मोठे नसले, तरी प्रभावी आहे. चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी (निर्मात्यांनी) मला डान्स करायला शिकवले.” हा चित्रपट ४ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricketer shikhar dhawan spoke about his bollywood debut movie double xl yps