सुप्रसिद्ध रॅपर हनी सिंगने शालिनी तलवारशी २०११ मध्ये लग्न केले होते. मागच्या महिन्यामध्ये त्यांचा घटस्फोट झाला. शालिनीने त्याच्याविरोधामध्ये कौटुंबिक हिंसाचार केल्याची तक्रार केली होती. याच प्रकरणावरुन तिने दिल्लीच्या जिल्हा न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला होता. न्यायालयाच्या मंजूरीनंतर त्यांचे वैवाहिक आयुष्य संपुष्टात आले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिने हनी सिंगकडे तब्बल १० कोटी रुपयांची पोटगी मागितली होती. पण न्यायालयाने त्याला १ कोटी रुपये पोटगी म्हणून देण्याचे आदेश दिले. या काळामध्ये त्याचे खासगी आयुष्य खूप चर्चेत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

यो यो हनी सिंग भारतातल्या टॉपच्या रॅपर्सपैकी एक आहे. त्याने अनेक दर्जदार गाणी तयार केली आहेत. तो सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. त्याने नुकताच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्याने कोणाचा तरी हात हातामध्ये घेतला असल्याचे लक्षात येते. हनी सिंगने या फोटोला आता “जे काही आहे ते फक्त तुझ्या-माझ्यामध्ये आहे. ‘टुगेदर फॉरेव्हर’ (Together forever) हे आमचं गाणं लवकरच प्रदर्शित होणार आहे”, असे कॅप्शन दिले आहे.

आणखी वाचा – भाजपाच्या ‘मराठमोळा दीपोत्सव’ कार्यक्रमात अपमान? राहुल देशपांडेनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले “इतकी मोठी…”

पोस्ट केलेल्या फोटोमधला हात त्याच्या कथित प्रेयसीचा असल्याच्या चर्चा सध्या रंगल्या आहेत. फोटोमध्ये तिचा चेहरा दिसत नसला, तरी हातामधल्या ब्रेसलेटवरुन नेटकऱ्यांनी हनी सिंगच्या प्रेयसीला शोधून काढले आहे. हा हात मॉडेल आणि अभिनेत्री टीना थडानीचा आहे अशी शक्यता वर्तवली जात आहे. टीनाने काही दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या फोटोमध्येही त्याच पद्धतीचे ब्रेसलेट घातलेले आहे. जर तिचा हा फोटो झूम केला, तर ते दोन्ही ब्रेसलेट एकच आहेत असे वाटते. सबरेडिट बॉली ब्लाइंड्स एन गॉसिपवर या संबंधित एक फोटो शेअर करण्यात आला आहे.

आणखी वाचा – ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून ब्रेक घेत समीर चौगुले ऑस्ट्रेलियाला रवाना, विमानामधील फोटो शेअर करत म्हणाले…

सध्या सोशल मीडियावर त्यांच्या अफेअर्सच्या चर्चांना उधाण आले आहे. हनी सिंग आणि टीना या दोघांनीही त्याबाबत अजूनतरी कोणत्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आली नसली, तरी चाहत्यांनी त्यांचे-त्याचे तर्क लावायला सुरुवात केली आहे. हनी सिंगच्या ‘पॅरिस का ट्रिप’ (Trip to paris), ‘टुगेदर फॉरेव्हर’ (Together forever) या गाण्यांमध्ये टीना झळकली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Do yo yo honey singh dating actress model tina thadani yps