प्रसिद्ध कोरिओग्राफर व दिग्दर्शक फराह खान आणि शाहरुख खान खूप जवळचे मित्र आहेत. एका मुलाखतीत, फराहला ४० व्या वर्षी आयव्हीएफद्वारे गर्भधारणा झाली, होती. ती तीन बाळांना जन्म देणार आहे, ही आनंदाची बातमी कुटुंबाबाहेरच्या कुणाला दिली असेल तर तो शाहरुख पहिला होता, असा खुलासा फराहने केला आहे. ‘ओम शांती ओम’चे शूटिंग करत असताना फराह गरोदर होती, त्यावेळी शाहरुख सेटवर खूप काळजी घ्यायचा, असं फराहने सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत फराहने सांगितलं की ती शूटच्या आधी आणि नंतर आयव्हीएफ उपचारांसाठी जायची. ते क्लिनिक सेटपासून एक तासाच्या अंतरावर होते. सुरुवातीला उपचारात खूप अडचणी येत होत्या, तेव्हा सेटवर परत येताना रडायचे, असं फराह म्हणाली.

“मी तिची फसवणूक केली,” भारत-पाकिस्तानी लेस्बियन जोडप्याचं पाच वर्षांचं नातं संपलं

“पहिल्या पाच-सहा महिन्यांत खूप त्रास झाला. मला खूपदा डॉक्टरांनी भूल दिली होती. एकदा डॉक्टरकडे गेल्यावर मला खात्री होती की मी गरोदर आहे, पण मला दवाखान्यातच मासिक पाळी आली. त्यानंतर बऱ्याचदा मी दवाखान्यातून शूटिंगला परत येईपर्यंत रडत असे. एके दिवशी मध्यरात्री मला डॉक्टरांचा फोन आला आणि सांगितलं की मी गरोदर नाही. आम्ही एक कॉमिक सीन शूट करत होतो. शाहरुखला कळालं की मला काहीतरी झालंय, कारण मी रडण्याच्या तयारीत होते. मग त्याने सर्वांना ब्रेक दिला आणि मला त्याच्या व्हॅनमध्ये नेलं, तिथे मी तासभर रडले होते,” असं फराह म्हणाली.

लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”

“मी म्हणाले, ‘मला तुला काहीतरी सांगायचं आहे’. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, ‘तू गरोदर आहेस का?’ आम्हाला दर्दे-ए-डिस्को गाण्याचं शूटिंग संपवायचं होतं आणि प्रत्येक वेळी तो शर्ट काढायचा तेव्हा मी त्याचं शर्ट वर फेकून देत असे. तो माझ्यासमोर बादली ठेवायचा. त्याने माझ्यासाठी एक छान काउच मागवला, जेणेकरून मी माईक घेऊन झोपू शकेन आणि लोकांवर ओरडू शकेन,” असं फराह म्हणाली.

फराहने २००४ दिग्दर्शक शिरीष कुंदर यांच्याशी लग्न केलं होतं. फराहला दोन मुली आणि एक मुलगा आहे. या तिघांचाही जन्म २००८ मध्ये झाला होता. हे तिघेही भावंड आता १६ वर्षांचे आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farah khan talks about struggling to conceive during om shanti om shoot says i cried front of shah rukh khan hrc
First published on: 26-03-2024 at 16:49 IST