Riteish & Genelia Deshmukh Funny Reels Video : मनोरंजन विश्वातील ‘आदर्श जोडी’ म्हणून रितेश-जिनिलीयाकडे पाहिलं जातं. मराठीसह बॉलीवूड कलाविश्वात या जोडप्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. रितेश-जिनिलीया सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात. विविध ट्रेंडिंग गाण्यावर किंवा व्हॉइसओव्हरवर हे दोघंही भन्नाट रील्स व्हिडीओ शेअर करत असतात.

रितेश-जिनिलीयाच्या Reels व्हिडीओला चाहत्यांची भरभरून पसंती मिळते. गेल्या काही दिवसांपासून हे दोघंही शूटिंगमध्ये आणि चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र होते. त्यामुळे बऱ्याच महिन्यांच्या ब्रेकनंतर रितेश-जिनिलीयाने चाहत्यांना खळखळून हसवण्यासाठी एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या पोस्टला रितेशने We Are Back असं कॅप्शन दिलं आहे.

रितेशने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये जिनिलीया कॉफी पीत असते. यावेळी दोघांमध्ये झालेला मजेशीर संवाद नेमका काय आहे वाचा…

जिनिलीया – गले में दर्द हो रहा है
रितेश – दबा दूँ
जिनिलीया – ( गोंधळात पडते आणि विचारते ) हा?
रितेश – ( लगेच शब्द बदलतो आणि म्हणतो ) दवा दूँ?? दवा..

दोघांमधला हा मजेशीर संवाद झाल्यावर बॅकग्राऊंडला “मौत को छूकर टक से वापस” असं ऐकू येतं. रितेशने जिनिलीयाची घेतलेली फिरकी पाहून कमेंट्समध्ये एकच हशा पिकला आहे.

सेलिब्रिटींसह नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर “भाऊ आणि वहिनी जोरात एकदम”, “तुम्हाला पाहूनच चेहऱ्यावर हसू उमटतं”, “तुम्ही दोघंही कमाल आहात”, “लय भारी भाऊ आणि वहिनी”, “तुम्ही सिनेमांमध्ये आणि रील्समध्येही बेस्टच काम करता” अशा असंख्य प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.

दरम्यान, ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या सेटवर २००२ मध्ये रितेश-जिनिलीयाची पहिली भेट झाली होती. यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री होऊन पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. जवळपास १० वर्षे एकमेकांना डेट केल्यावर रितेश-जिनिलीयाने २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली.

दोघांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर जिनिलीया नुकतीच आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ या सिनेमात झळकली. तर, रितेशच्या ‘रेड २’ आणि ‘हाऊसफुल ५’ या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केल्याचं पाहायला मिळालं.