Genelia Deshmukh : जिनिलीया व रितेश देशमुख यांच्याकडे मनोरंजन विश्वातील आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. यांची पहिली भेट ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. ओळख, मैत्री अन् त्यानंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. जवळपास १० वर्षे एकमेकांना डेट केल्यावर रितेश-जिनिलीयाने २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रितेश-जिनिलीयाने ( Genelia Deshmukh ) २०१४ मध्ये त्यांचा पहिला मुलगा रियानला जन्म दिला. यानंतर २०१६ मध्ये या जोडप्याने त्यांचा दुसरा मुलगा राहिलचं स्वागत केलं. या दोन्ही मुलांच्या संस्कारांचं नेहमीच कौतुक केलं जातं. विशेषत: अभिनेत्रीने लग्नानंतर काही काळ कलाविश्वातून ब्रेक घेतला होता. मुलं झाल्यावर जिनिलीयाने पूर्णवेळ घराची जबाबदारी सांभाळली. आता तिची दोन्ही मुलं मोठी झाल्यावर अभिनेत्री पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात सक्रिय झाली आहे.

हेही वाचा : “तू फक्त काही आठवड्यांची होतीस…”, लाडक्या लेकीच्या वाढदिवशी आलियाने शेअर केला २ वर्षांपूर्वीचा फोटो, राहाला म्हणाली…

जिनिलीयाने शेअर केला खास व्हिडीओ

रितेश-जिनिलीया ( Genelia Deshmukh ) सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. त्यांचे मजेशीर व्हिडीओ, रोमँटिक फोटो, मराठमोळा अंदाज या गोष्टी कायम चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. सध्या अभिनेत्रीने शेअर केलेला असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. यामध्ये रितेश-जिनिलीयाच्या दोन्ही मुलांमध्ये आपआपसांत किती सुंदर बॉण्डिंग आहे हे पाहायला मिळत आहे. रियान अन् राहिलचं नातं पाहून त्यांचे आई-बाबा देखील भारावून गेल्याचं कॅप्शन वाचून स्पष्ट होत आहे.

रितेश-जिनिलीयाचा मोठा मुलगा रियान तीन दिवसीय शिबिरासाठी निघाल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळतंय. आपल्या भावाला कॅम्पकरता बसपर्यंत सोडण्यासाठी रियानचा लहान भाऊ राहिल देखील उपस्थित होता. आपल्या दादाला मोठ्या प्रेमाने तो Bye करत असल्याचं यामध्ये पाहायला मिळालं.

हेही वाचा : चारुलताच भुवनेश्वरी! अक्षराची शंका खरी ठरली, ‘त्या’ गोष्टीमुळे मास्तरीण बाईंनी अचूक ओळखलं; मालिकेत काय घडणार? पाहा प्रोमो

अभिनेत्री ( Genelia Deshmukh ) या व्हिडीओला कॅप्शन देत लिहिते, “मोठा भाऊ ३ दिवसांच्या कॅम्पसाठी निघालाय आणि त्याचा लहान भाऊ त्याला bye करण्यासाठी आलाय…Ufff #ब्रदर्सबॉण्ड” पत्नीने शेअर केलेला हा व्हिडीओ रितेशने देखील त्याच्या अकाऊंटवरून रिशेअर केला आहे.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/11/genelia.mp4

दरम्यान, रियान आणि राहिल कायमचं एकमेकांना साथ देत असल्याचं पाहायला मिळतं. एवढंच नव्हे, तर संपूर्ण देशमुख कुटुंबातील मुलांमध्येच एक सुंदर बॉण्डिंग आहे. गणपतीच्या दिवसांमध्ये रितेश-जिनिलीयाच्या या दोन मुलांनी अमित व धीरज देशमुख यांच्या मुलांच्या साथीने बाप्पाच्या मूर्ती घडवल्या होत्या. याचा व्हिडीओ देखील सर्वत्र व्हायरल झाला होता आणि नेटकऱ्यांनी या मुलांच्या संस्कारांचं भरभरून कौतुक केलं होतं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Genelia deshmukh impress after seeing beautiful bond between her two sons shares video sva 00