काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांनाच खडे बोल सुनावणारे ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आता त्यांच्या उर्दूबद्दलच्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. पत्नी शबाना आझमीसह ‘शायराना – सरताज’ नावाचा उर्दू गीतांचा अल्बम त्यांनी लाँच केला. यावेळी त्यांनी उर्दू भाषेचे महत्त्व आणि तिच्या वाढीसाठी पंजाबने बजावलेली भूमिका यावर भाष्य केलं. उर्दू ही पाकिस्तान किंवा इजिप्तची नाही, ती हिंदुस्थानची भाषा आहे, असंही ते या कार्यक्रमात म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंडप सजला, पाहुणेही आले पण स्वरा भास्कर आणि फहाद अहमदने लग्नच केलं नाही, कारण…

जावेद अख्तर म्हणाले, “उर्दू इतर कोणत्याही ठिकाणाहून आलेली नाही…ती आपली स्वतःची भाषा आहे. ती हिंदुस्थानाबाहेर बोलली जात नाही…पाकिस्तानही भारतापासून फाळणीनंतर अस्तित्वात आला, त्यापूर्वी तो भारताचाच भाग होता. त्यामुळे ही भाषा हिंदुस्थानाबाहेर बोलली जात नाही.”

“उत्तम अभिनय येतो म्हणून नखरे…” रोहित शेट्टीने सांगितलेलं मराठी कलाकारांना चित्रपटांत घेण्यामागचं कारण

“उर्दू भाषा वाढवण्यात पंजाबचे मोठे योगदान आहे आणि ती भारताची भाषा आहे! पण आपण ही भाषा का सोडली? फाळणीमुळे? पाकिस्तानमुळे? खरं तर आपण उर्दूकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. पूर्वी फक्त हिंदुस्थान होता, पाकिस्तान फाळणीनंतर हिंदुस्थानपासून वेगळा झाला. आता पाकिस्तान म्हणतं की काश्मीर आमचं आहे. तुम्ही यावर विश्वास ठेवणार का? मला वाटतं, नाही’! त्याचप्रमाणे, उर्दू ही हिंदुस्थानी भाषा आहे आणि भाषा कायम तशीच राहते. आजकाल आपल्या देशात नवीन पिढीचे तरुण उर्दू आणि हिंदी कमी बोलतात, कारण त्यांचं सर्वाधिक लक्ष इंग्रजीवर आहे. आपण हिंदीत बोललं पाहिजे कारण ती आपली राष्ट्रभाषा आहे,” असं जावेद अख्तर यावेळी बोलताना म्हणाले.

भाषा ही धर्मांवर आधारित नसून प्रदेशांवर आधारित असते, असंही त्यांनी नमूद केलं. भाषा जर धर्मावर आधारित असेल तर ती एकच भाषा असेल, असं त्यांनी युरोपचं उदाहरण देत नमूद केलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Javed akhtar says urdu is hindustani language pakistan came into existence after partition hrc