बॉलिवूड अभिनेता सनी कौशल सध्या त्याच्या ‘चोर निकल के भागा’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाच्या प्रमोशनसंदर्भात दिलेल्या मुलाखतीत सनी कौशलने त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी मोकळेपणाने सांगितले आहे. सनीने वहिनी कतरिना कैफसोबत बॉन्डिंगबद्दल माहिती दिली आहे. त्याने सांगितले की कतरिना त्याच्यासाठी खास गोष्टी करत असते. त्याने त्याच्या वाढदिवसाशी संबंधित एक मनोरंजक किस्साही शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- Video : “मलई खाऊन दुसऱ्या ठिकाणी…” प्रियांका चोप्राच्या ‘त्या’ वक्तव्यावर राखी सावंतचा संताप

सनी कौशलने नुकतेच सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत वहिनी कतरिना कैफबद्दल बोलले आहे. त्याने सांगितले की त्याची त्याच्या वहिनीशी किती छान मैत्री आहे. जेव्हा सनीला विचारण्यात आले की कतरिनाने त्याच्यासाठी सर्वात गोड गोष्ट कोणती केली आहे? यावर सनीने आपल्या वाढदिवसाचा किस्सा सांगितला. सनीने सांगितले की, दोन वर्षांपूर्वी कतरिनाने तिच्या वाढदिवसाला एक सरप्राईज दिले होते. कतरिनाने त्याला स्नीकरच्या (बूटांच्या) आकाराचा केक दिला. सनी म्हणतो की ‘मला स्नीकर्स खूप आवडतात आणि तिने माझ्यासाठी एक मोठा स्नीकर आकाराचा केक आणला, मला माहित नव्हते की ती हे करू शकते पण मला ते खूप गोड वाटले’.

हेही वाचा- २२व्या वर्षी लग्न, पाच मुलं आणि…; लग्नानंतरही राज कपूर यांचं सुप्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर होतं अफेअर, पत्नीला समजलं अन्…

बाँडबद्दल बोलताना सनी म्हणाली, ‘आम्ही खूप चांगले मित्र झालो आहोत. कधी-कधी आम्ही कुटुंबासोबत बसतो तेव्हा कतरिना आणि मी आपापसात बोलण्यात गुंग होतो आणि बाकीचे सगळे आमचे बोलणे संपण्याची वाट पाहत असतात. आम्हाला एकमेकांशी बोलायला आवडते आणि आमच्याकडे खूप काही बोलायला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Katrina kaif surprised sneaker gift to law sunny kaushal on his birthday dpj