सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. लग्नानंतरचा सिद्धार्थ-कियाराचा हा पहिलाच व्हॅलेंटाइन आहे. व्हॅलेंटाइन दिनानिमित्त कियाराने सोशल मीडियावरुन सिद्धार्थसाठी असलेलं प्रेम व्यक्त केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कियाराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सिद्धार्थबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला कियाराने “प्यार का रंग चढा है” असं कॅप्शन दिलं आहे. कियाराने व्हॅलेंटाइन दिनानिमित्त शेअर केलेली ही पोस्ट चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. या फोटोवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

हेही वाचा>> “मी १०० टक्के प्रयत्न केले, पण…” एमसी स्टॅन ‘बिग बॉस’चा विजेता झाल्यानंतर शिव ठाकरेचं मोठं वक्तव्य, म्हणाला “त्याच्या नशिबात…”

कियाराने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने पांढऱ्या रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान केला आहे. खड्यांच्या ज्वेलरीने तिने खास लूक केल्याचं दिसत आहे. तर सिद्धार्थने पिवळ्या रंगाचा कुर्ता पायजमा परिधान करत हटके लूक केला आहे. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

हेही वाचा>> “गौतमी पाटील नाचलेली चालते पण…” मराठी सिनेमाला अडल्ट म्हणण्यावरुन अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

सिद्धार्थ व कियाराने ७ फेब्रुवारीला कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेसवर त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर मुंबईत सिद्धार्थ-कियाराच्या वेडिंग रिसेप्शनची पार्टीही ठेवण्यात आली होती. सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाप्रमाणेच पार्टीतील फोटोही तुफान व्हायरल झाले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kiara advani shared special post for husband sidharth malhotra on valentines day 2023 kak