“माझ्यासमोर शाहरुख नाही टिकला, हा तर बिचारा…”; अभिनेत्याने उडवली कपिल शर्माची खिल्ली

कपिल शर्माचा कपिल शर्माचा ‘झ्विगाटो’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपट चांगली कमाई करताना दिसत नाहीये. यावरुनही अभिनेत्याने कपिल शर्माला टोला लगावला आहे

kapil-sharma
अभिनेत्याने उडवली कपिल शर्माची खिल्ली (छायाचित्र लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

अभिनेता आणि समीक्षक केआरके त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमी चर्चेत असतो. केकेने आपल्या अनेक ट्विटमध्ये बॉलीवूड चित्रपट आणि सेलिब्रिटींची खिल्ली उडवली आहे, ज्यामुळे कधी त्याची कधी प्रशंसा होते तर कधी त्याला ट्रोल केले जाते. मात्र यंदा केआरकेने आपल्या एका ट्विटमध्ये शाहरुख खान आणि कपिल शर्मा यांच्यावर निशाणा साधला आहे, त्यानंतर केआरकेला चाहत्यांकडून ट्रोल केले जात आहे. काही ट्रोल्सनी पुन्हा एकदा त्याच्या देशद्रोही चित्रपटाची आठवण करून दिली आहे.

हेही वाचा- राणादा-पाठकबाईंनी साजरा केला लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा, फोटोमधील अक्षयाच्या साधेपणाने वेधलं लक्ष

या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात केआरकेच्या त्या ट्विटपासून झाली होती, ज्यामध्ये त्याने कपिल शर्माला टोमणा मारला होता आणि झ्वीगाटोवर टिप्पणी केली होती. केआरकेने लिहिले की, ‘कपिल शर्माचा चित्रपट डक झाला आणि यावरून हे सिद्ध होते की तो फक्त लोकांसाठी जोकर आहे. जो कोणी पाहतो, तो कपिल शर्मा पाहुण्यांसाठी पाहतो, कपिल शर्मासाठी नाही. आता मला आशा आहे की कलाकार त्याचा टीआरपी वाढवण्यासाठी त्याच्या शोमध्ये जाणे बंद करतील. केआरकेने या ट्विटमध्ये अक्षय कुमार आणि कार्तिक आर्यनलाही टॅग केले आहे.

काया आहे केआरकेच ट्वीट

केआरकेच्या एका ट्विटवर एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, “भाऊ, मनावर घेऊ नका, पण कपिल एक सेलिब्रिटी आहे, तर तू फक्त यूट्यूबर आहेस. यावर केआरकेने ट्विट केले की, “भाऊ, माझ्यासमोर शाहरुख खान टिकत नाही, हा बिचारा कपिल शर्मा आहे.” केआरकेचे हे ट्विट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

हेही वाचा- आमिर खानच्या भाच्याचा घटस्फोट झाला? अभिनेता इमरान खानची पत्नी अवंतिकाने शेअर केली पोस्ट, म्हणाली…

ट्वीटवरुन केआरके ट्रोल

या ट्वीटवरुन सोशल मीडिया यूजर्स केआरकेला खूप ट्रोल करत आहेत. एका ट्रोलने लिहिले, ‘आबे ज्याच्या नावाची कॉपी करतो त्याच्याशी स्वत:ची तुलना करत आहे.’ तर दुसऱ्याने लिहिले- ‘तुम्ही खूप मोठे शब्द बोलता.’ दुसऱ्याने लिहिले- ‘का टिकेल, त्याच्याकडे काम आहे.’ दुसऱ्याने लिहिले- ‘ अब कोणता नशा करतो तू शाहरुख खान ब्रँड आहे. अशा अनेक कमेंट्स या ट्विटवर पाहायला मिळत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-03-2023 at 15:30 IST
Next Story
आमिर खानच्या भाच्याचा घटस्फोट झाला? अभिनेता इमरान खानची पत्नी अवंतिकाने शेअर केली पोस्ट, म्हणाली…
Exit mobile version