गायक मिका सिंगने कमाल आर खान (KRK) केआरके विरोधात वादग्रस्त आरोप केले असून, त्यावर प्रतिक्रिया देत केआरकेने आता त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने मिकावर जोरदार टीका केली आहे आणि कपिल शर्माबरोबर झालेल्या वादाबद्दल भाष्य केले आहे. मिकाने एका मुलाखतीत सांगितले की, त्याने कपिल शर्माला केआरकेच्या घरी नेले होते, जिथे त्यांनी गोंधळ घातला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केआरकेने त्याच्या व्हिडीओमध्ये म्हटले, “मिका हा गाढव आहे, तो अशिक्षित आणि बेशिस्त आहे, तरी स्वत:ला गायक म्हणवतो. मिका म्हणाला होता की, मी त्याला दुबईत भेटलो होतो आणि त्याने माझ्याशी गैरवर्तन केलं. त्यानंतर त्याने सांगितलं की, त्याला काहीही आठवत नाही. होय, तो दुबईत मला भेटला होता, पण त्यानंतर सतत मला कॉल करत राहिला, म्हणून मी त्याला घरी बोलावलं. मात्र, तो आला नाही. त्याच्या मॅनेजरकडून मला समजलं की, मिकाला वाटलं की मी त्याचं अपहरण करीन. या विशेष कर्तृत्व नसलेल्या माणसाचं अपहरण करून मला काय मिळणार? तो माझ्यालेखी काहीच नाहीये.”

हेही वाचा…Video: सलमान खानने जामनगरमध्ये गायलं २८ वर्षे जुनं गाणं; नीता अंबानींच्या आईने केलेल्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

केआरके पुढे म्हणाला, “त्याच्या मॅनेजरने मला त्याच्या हॉटेलवर बोलावले. तिथे हनी सिंगही होता, ज्याचं मोठं सूट (मोठा रूम होता), तर मिकाचा छोटासा रूम होता. मिकाने मला त्याच्या शोला यायचे आमंत्रण दिलं , पण मी मला काम आहे असं सांगून गेलो नाही.”

मुंबईतील एका घटनेचा उल्लेख करत केआरके म्हणाला की, त्याच्या सुरक्षारक्षकांनी मिका आणि कपिलला त्याच्या घरी मद्यधुंद अवस्थेत आल्यावर चापट मारली होती. तो म्हणाला, मिकाने सांगितले की, तो आणि कपिल शर्मा माझ्या घरी मुंबईत आले आणि गैरवर्तन केले.” खर काय आहे ते तुम्ही गुगल केलं तरी तुम्हाला समजेल. प्रत्यक्षात ते दोघेही त्या रात्री मद्यधुंद अवस्थेत होते. ते माझ्या घरी आले आणि सुरक्षारक्षकांना मला भेटण्यासाठी सांगितलं, पण त्यांनी त्यांना आत सोडले नाही. त्यांनी माझ्या घराच्या खाली फोटो काढले आणि मला भेटण्यासाठी आग्रह धरला. शेवटी सुरक्षारक्षकांना त्यांना चापट मारून बाहेर काढावं लागलं. त्यानंतर कपिलने रात्री काही ट्वीट केले, ज्यावर मी दुसऱ्या दिवशी प्रतिक्रिया दिली.”

हेही वाचा…Video : आशा भोसले यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी ‘तौबा तौबा’ गाणे गात धरला ठेका, केली विकी कौशलची प्रसिद्ध हूकस्टेप

केआरके पुढे म्हणाला, “मी दुसऱ्या दिवशी मिकाच्या घरी जाऊन त्याला धडा शिकवला. त्याला पुन्हा असं काही करू नकोस असा इशारा दिला, आणि नंतर त्याने माफी मागितली. तो म्हणतो की, बॉलीवूड त्याला घाबरतं, पण त्याने आयुष्यात काय मिळवलं? राखी सावंतला किस करणं हा त्याचा मोठा पराक्रम आहे का?”

हेही वाचा…Video : “हजारों जवाबों में खामोशी अच्छी…”, दिलजीत दोसांझने लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान केले डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मरण; म्हणाला…

मिका सिंगने एका मुलाखतीत सांगितले होते की, “हनी सिंग केआरकेमुळे खूप त्रस्त होता. आयुष्यमान खुराणा, कपिल शर्मा सुद्धा त्याच्या वागण्याने त्रस्त होते. मी हनीला म्हटले, आपण त्याला भेटू, दारू पिऊन त्याच्याशी बोलू. आम्ही त्याचाशी खूप उद्धटपणे वागलो. दुसऱ्या दिवशी केआरके म्हणाला की, आम्ही खूप गैरवर्तन केलं. मी त्याला सांगितलं, मला काही आठवत नाही कारण आम्ही दारू प्यायलो होतो. आम्ही त्याचे केस ओढले असतील.” असे मिका सिंग एका मुलाखतीत म्हणाला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Krk reveals his side of feud with mika singh and kapil sharma said his guards slap them psg