Neena Gupta Sanjay Mishra Film Vadh Is Not Based On Shraddha walkar Murder Case | Loksatta

श्रद्धा वालकर हत्याकांडावर आधारीत आहे ‘वध’ चित्रपट? नीना गुप्ता सत्य सांगत म्हणाल्या….

‘वध’ चित्रपटाच्या ट्रेलवरून तो श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाबद्दल असल्याची चर्चा सुरू आहे.

श्रद्धा वालकर हत्याकांडावर आधारीत आहे ‘वध’ चित्रपट? नीना गुप्ता सत्य सांगत म्हणाल्या….
(फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूड कलाकार नीना गुप्ता आणि संजय मिश्रा ‘वध’ या सायकॉलॉजिकल थ्रिलर चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. विनोदी भूमिकांसाठी ओळखले जाणारे संजय मिश्रा या चित्रपटात एक गंभीर व्यक्तिरेखा साकारत आहेत. हा चित्रपट ९ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. ज्याचा ट्रेलर शुक्रवारी रिलीज झाला आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर हा चित्रपट श्रद्धा वालकर हत्याकांडावर आधारित असल्याचं काही जण म्हणत आहेत. याबद्दल नीना गुप्ता यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

‘एएनआय’शी बोलताना नीना गुप्ता म्हणाल्या, “अशा बातम्यांवर विश्वास ठेवू नका. आमच्या चित्रपटाचा श्रद्धा मर्डर केसशी काहीही संबंध नाही. कृपया चित्रपटाबद्दल कोणतेही अंदाज वर्तवू नका. या चित्रपटात एका हत्येचं चित्रण केलं गेलं आहे, पण त्याचा या श्रद्धा वालकर प्रकरणाशी संबंध नाही.”

हेही वाचा – “घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय कारण…” नीना गुप्ता यांनी मांडलं भारतीय लग्नसंस्थेबद्दल मत

या चित्रपटातील हत्येचे चित्रण दिल्लीतील छतरपूरमध्ये आफताब पूनावालाने आपल्या लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची हत्या केल्याप्रमाणेच असल्याचं बोललं जात आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन मुलाखतीदरम्यान नीना गुप्ता यांनी याबद्दल स्पष्टीकरण देत चित्रपटाचा विषय वेगळा असल्याची माहिती दिली.

“मी गरोदर असल्याचं कळताच पालकांनी…” नीना गुप्तांनी सांगितली जुनी आठवण

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत नीना म्हणाल्या की, “मला चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली होती. यासोबतच संजय मिश्रा हे देखील वध चित्रपटात काम करण्यामागचं एक मोठं कारण आहेत. मला संजय मिश्रा यांचं काम खूप आवडतं आणि मी त्यांचे चित्रपट बघते. या चित्रपटात संजय मिश्रा काम करत असल्याचं कळताच मी चित्रपटासाठी होकार दिला, कारण मला त्यांच्याबरोबर काम करायचं होतं.”

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 19:17 IST
Next Story
“जाड्या म्हशीसारखी दिसणारी मी…” ‘गीता माँ’ स्पष्टच बोलली