अभिनेत्री नीना गुप्ता या त्यांच्या अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टींवर भाष्य केलं. पती विवेक मेहरा यांच्याशी झालेली भेट, लेक मसाबाचं पहिलं लग्न आणि घटस्फोट, तिने घटस्फोटाबद्दल सांगितल्यानंतर झालेली अवस्था याबद्दल नीना गुप्ता यांनी माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रणवीर अहलाबादियाला दिलेल्या मुलाखतीत नीना गुप्तांनी पतीशी भेट कुठे झाली, त्याबद्दल खुलासा केला. “मी एकदा थेरपीसाठी गेले होते. तिथे मी माझ्या आत्ताच्या पतीला (विवेक मेहरा) भेटले. ते आधीच विवाहित होते, त्यांना मुलंही होती त्यामुळे खूप समस्या होत्या म्हणून एकदा आम्ही कपल थेरपीला गेलो होतो,” असं त्यांनी सांगितलं. तसेच स्वत:शी बोलणं खूप आरोग्यदायी आहे, मी भिंतीशीही बोलू शकते, असंही नीना म्हणाल्या.

“त्याने मला…”, गरोदर असल्याचं कळताच जेव्हा नीना गुप्तांनी विवियन रिचर्ड्सना केला होता फोन

नीना यांना चाहत्यांना रिलेशनशिपबद्दल सल्ला द्यायला सांगितल्यावर त्यांनी नकार दिला. “रिलेशनशिपबाबत सल्ला देण्यासाठी मी चुकीची व्यक्ती आहे. कारण मी नेहमीच चुकीच्या लोकांना डेट केलं आहे. त्यामुळे मला विचारू नका कारण मी खूप फालतू आणि वाईट उत्तर देईन,” असं त्या म्हणाल्या.

या मुलाखतीत नीना यांनी त्यांची मुलगी मसाबाच्या पहिल्या लग्नाबाबत झालेल्या चुकीबद्दल भाष्य केलं. मसाबाचं पहिलं लग्न मधु मंटेनाशी झालं होतं. “मसाबाला लग्न करायचे नव्हते. तिला आधी तिच्या भावी पतीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे होते. पण मी त्यास नकार दिला. ‘तू त्याच्याबरोबर शिफ्ट होणार नाहीस. सोबत राहायचं असेल तर तू लग्न कर,’ असं मी म्हटलं. ही माझी चूक होती आणि नंतर ते विभक्त झाले. त्यांच्या घटस्फोटामुळे मी उद्ध्वस्त झाले होते. मी त्यांच्या घटस्फोटाची कल्पनाही केली नव्हती कारण माझे पती आणि मी दोघेही तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीवर खूप प्रेम करत होतो आणि अजूनही प्रेम करतो. तो खरोखर छान माणूस आहे, पण त्याचं आणि मसाबाचं लग्नानंतर नाही पटलं. तिने घटस्फोटाबद्दल सांगितल्यावर मी महिनाभर सुन्न झाले होते. तो काळ खूप कठीण होता. पण तुमच्या हातात काही नाही, कारण हे दुसऱ्याचे आयुष्य आहे,” असं नीना म्हणाल्या.

“जेव्हा पुरुष गरोदर…” स्त्री-पुरुष समानतेबद्दल अन् ‘फेमीनिजम’बद्दल नीना गुप्तांनी केलं परखड भाष्य

दरम्यान, फॅशन डिझायनर व अभिनेत्री मसाबा ही नीना आणि वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स यांची मुलगी आहे. नीना आणि विवयन यांचे लग्न झाले नव्हते. ते रिलेशनशिपमध्ये होते आणि नीना गरोदर राहिल्या. त्यानंतर विवियन यांच्या म्हणण्यानुसार नीना यांनी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला आणि तिचा सांभाळही एकल माता म्हणून केला. मसाबाने २०१५ मध्ये मधु मंटेनाशी लग्न केलं, पण चार वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. नंतर मसाबाने त्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये अभिनेता सत्यदीप मिश्राशी लग्न केले. तिच्या लग्नाला वडील विवियन रिचर्ड्स उपस्थित राहिले होते.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neena gupta says i have always dated wrong people talk about husband and daughter masaba gupta hrc