‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून २०२३ रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर यातील संवाद, व्हिएफएक्स तसेच प्रभास, सैफ अली खान व क्रिती सेनॉन यांच्या लुकवरून नेटकरी नाराजी व्यक्त करत आहेत. दिग्दर्शक ओम राऊत आणि लेखक मनोज मुंतशीर यांच्यावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : खुशी कपूर करतेय प्रसिद्ध गायकाला डेट? ‘त्या’ गाण्यात अभिनेत्रीच्या नावाचा उल्लेख, सोशल मीडियावर चर्चांना उधाण

‘आदिपुरुष’ चित्रपटात सीतेची भूमिका साकारलेल्या अभिनेत्री क्रिती सेनॉनला अलीकडेच पापाराझींनी वर्सोवा येथील मुकेश छाबडा यांच्या ऑफिसमध्ये जाताना पाहिले. अभिनेत्रीचा हा व्हिडीओ ‘इन्स्टंट बॉलीवूड’ या पापाराझी पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये क्रितीने शॉर्ट्सवर लॉंग जॅकेट परिधान केले होते. यापूर्वी ‘आदिपुरुष’ चित्रपटाचे प्रमोशन करताना क्रितीने ट्रेडिशनल लुकला प्राधान्य दिल्यामुळे आता नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला ट्रोल केले आहे.

हेही वाचा : “सरोजजी मला आणि सैफला कानाखाली मारणार होत्या” काजोलने सांगितला ‘तो’ किस्सा; म्हणाली, “सेक्सी-लाज हे शब्द…”

क्रिती सेनॉनच्या या व्हायरल व्हिडीओवर एका युजरने “आदिपुरुषमधील सीतेची भूमिका संपली आता पुन्हा असे शॉर्ट ड्रेस घालणं सुरु केलेस” अशी कमेंट केली आहे, तर दुसऱ्या एका युजरने “क्रिती सेनॉन ही फ्लॉप हिरोईन आहे आणि एवढ्या चांगल्या चित्रपटाची ओम राऊत आणि क्रितीने मिळून वाट लावली.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा : ‘दिलवाले दुल्हनिया’ ते ‘लस्ट स्टोरीज २’ काजोलने सांगितला प्रेमसंबंधातील फरक; म्हणाली, “९० च्या दशकातील प्रेमाला आता मूर्खपणा…”

दरम्यान, ‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभासने रामाची, तर क्रिती सेनॉनने सीतेची भूमिका साकारली आहे. सनी सिंगने लक्ष्मणाची, तर हनुमानाची भूमिका देवदत्त नागेने साकारली आहे. भूषण कुमार निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले असून पटकथा मनोज मुंतशीर यांनी लिहिली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netizens trolls actress kriti sanon as she visit mukesh chabra versova office sva 00