गेल्या चार-पाच दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांच्या अफेअरच्या चर्चा होत आहेत. दोघेही दोन दिवस मुंबईत एकत्र दिसले होते, त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या बातम्या येऊ लागल्या. दोघेही एकत्र शिकले असून चांगले मित्र असल्याची माहिती आली होती. पण नुकताच समोर आलेल्या परिणीतीच्या एका व्हिडीओमुळे चर्चा आणखी रंगल्या आहेत. परिणीतीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा याच्या घरी परिणीतीला स्पॉट करण्यात आलं. या व्हिडिओमुळे तिच्या लग्नाची तयारी सुरु झाल्याची चर्चा चाहत्यांमध्ये आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परिणीतीच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हारल

रविवारी परिणीती मनीष मल्होत्रा यांच्या घरी पोहोचली होती. व्हिडिओ बघून परिणीतीच्या लग्नाच्या कपड्यांची जबाबदारी मनीषवर असल्याची शक्यता चाहते व्यक्त करते आहे. परिणीतीच्या व्हिडीओवर चाहते कमेंट आणि लाईक करत आहेत.

राघव आणि परिणीतीच्या कुटुंबीयांकडून लग्नाची चर्चा

राघव आणि परिणिती या दोघांनीही लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिक्षण घेतले आहे आणि त्यांचे अनेक कॉमन मित्र आहेत, या व्यतिरिक्त त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. पण, आता एका रिपोर्टनुसार त्यांच्या कुटुंबियांनी लग्नाबद्दल बोलणी सुरू केली आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’मधील एका वृत्तानुसार, परिणीती व राघव या दोघांच्या कुटुंबीयांनी लग्नाबाबत चर्चा सुरू केली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parineeti chopra spotted at fashion designer manish malhotra home after dating rumors with mp raghav chadda dpj