प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राचं लग्न ठरलं आहे. सिद्धार्थ अभिनेत्री नीलम उपाध्यायशी लग्न करणार आहे. ३५ वर्षीय सिद्धार्थ हा प्रियांकाचा लहान भाऊ आहे. प्रियांका पती निक जोनस व लेक मालतीबरोबर सिद्धार्थच्या ‘रोका सेरेमनी’ साठी भारतात आली होती. प्रियांकाच्या होणाऱ्या वहिनीने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

नीलम उपाध्यायने सिद्धार्थ चोप्राला टॅग करत इन्स्टाग्रामवर या खास क्षणांचे फोटो शेअर केले आहेत. यात दोघेही रोमँटिक पोज देताना दिसत आहेत. तसेच काही फोटोंमध्ये दोघांचे कुटुंबीयही दिसत आहेत. फोटोंमध्ये प्रियांका चोप्रा, निक जोनस, मालती, प्रियांकाची आई मधू चोप्रा, मन्नारा चोप्रा, तिची आई कामिनी चोप्रा, बहीण मिताली आणि नीलमचे कुटुंबीय दिसत आहेत.

प्रियांका चोप्राच्या भावाचं लग्न ठरलं, होणाऱ्या वहिनीने शेअर केले ‘रोका’ सेरेमनीचे सुंदर फोटो

सिद्धार्थ चोप्रा याआधी इशिता कुमारशी लग्न करणार होता, त्यांचा साखरपुडाही झाला होता, पण ते नातं फार काळ टिकलं नाही. इशिता कुमार आणि सिद्धार्थची एंगेजमेंट तुटली. प्रियांका भावाच्या लग्नासाठी भारतात आली होती, पण लग्न पुढे ढकलल्याची बातमी आली. नंतर त्यांनी साखरपुडा मोडल्याचं समोर आलं. त्यानंतर सिद्धार्थच्या आयुष्यात नीलम आली. दोघेही एकमेकांना डेट करत होते, ते आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एकमेकांसोबतचे फोटोही शेअर करायचे. आता दोघांनी रोका करत नातं अधिकृत केलं आहे.

नीलम उपाध्याय दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने २०१२ मध्ये ‘मिस्टर 7’ या तेलुगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. तिने तमिळ भाषेतील काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे.