बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. शनिवारी दिल्लीतील कपूरथला हाऊस या ठिकाणी या दोघांचा साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याचे अनेक फोटो समोर आले आहेत. आता त्यांच्या साखरपुड्यातील एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याचा एक खास व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत परिणीतीच्या ‘केसरिया’ या चित्रपटातील ‘वे माही’ हे गाणं बॅकग्राऊंडला वाजताना दिसत आहे. परिणीती ही या गाण्यावर लिपसिंक करताना दिसत आहे.
आणखी वाचा : Made For Each Other! परिणिती चोप्रा-राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत का?

यावेळी तिचे हावभाव फारच खास आहे. राघवबरोबर साखरपुडा झाल्यानंतर ती फारच आनंदात असल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. परिणीती हे गाणं गात असताना दुसरीकडे राघव तिला गालावर किस करताना दिसत आहे. राघवच्या या कृतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. ‘विरल भय्यानी’ हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

दरम्यान परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुडा दिल्लीतील कपूरथला हाऊस या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या साखरपुड्याच्या खास फोटोंची सोशल मीडियात चर्चा पाहायला मिळत आहे. त्या दोघांनी साखरपुड्यासाठी खास लूक केला होता.

आणखी वाचा : “अखेर ती ‘हो’ म्हणाली…” परिणिती चोप्रा-राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याचा पहिला फोटो अखेर समोर

यावेळी परिणितीने पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तर राघवनेही त्याच रंगाचा सूट परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. “मी प्रार्थना केली… अखेर ती हो म्हणाली”, असे कॅप्शन राघव यांनी या फोटोला दिले आहे. या फोटोत राघव चड्ढा आणि परिणिती साखरपुड्याची अंगठी पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raghav chadha kisses parineeti chopra during engagement ceremony see video nrp