ड्रामा क्वीन राखी सावंतला आज पोलिसांनी अटक केली होती. मॉडेल व अभिनेत्री शर्लिन चोप्राचा आक्षेपार्ह व्हिडीओ व फोटो व्हायरल केल्याप्रकरणी राखीला अंबोली पोलिसांनी अटक केली होती. दिवसभर तिची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी तिची सुटका केली. राखीने पोलीस स्टेशनमधून बाहेर आल्यानंतर प्रतिक्रिया दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सामूहिक बलात्कार, ५ लग्न, ब्रेस्ट सर्जरी अन् सेक्स टेप; कायमच चर्चेत असते ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री

राखी सावंत बाहेर आल्यावर म्हणाली, “जय महाराष्ट्र, जय भारत, मी फक्त माझ्या आईला भेटायला रुग्णालयात आले आहे. मला डॉक्टरांचा फोन आला की माझ्या आईची प्रकृती गंभीर झाली आहे, तिची प्रकृती ठिक नाही. मला चक्कर येत आहे, माझा बीपी लो झालाय, मी दिवसभर जेवणही केलेलं नाही,” असं राखीने सांगितलं. यावेळी राखी बुरखा घालून दिसली. तिने यावेळी पोलीस चौकशीबाबत कोणतीही थेट प्रतिक्रिया दिली नाही.

राखी सावंतला आंबोली पोलिसांनी ८३३/२०२२ क्रमांकाच्या एफआयआरप्रकरणी अटक केली होती. काल राखी सावंतने यासंदर्भात अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज न्यायालयानं फेटाळून लावल्याने आज राखीला अटक करण्यात आली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakhi sawant first reaction after getting out from police station says jay maharashtra hrc