बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहते चित्रपटाशी संबंधित प्रत्येक अपडेटसाठी उत्सुक आहेत. या चित्रपटाचा धमाकेदार प्री टीझर रविवारी प्रदर्शित करण्यात आला. ‘अॅनिमल’च्या प्री-टीझर व्हिडीओमध्ये रणबीर कपूर अॅक्शन अवतारात दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – Video: “तुम्हाला काहीच ओरिजिनल करता येत नाही…,” ‘अ‍ॅनिमल’चा प्री-टीझर पाहून नेटकरी नाराज

टीझरमध्ये तो कॉरिडॉरमध्ये कुऱ्हाडीच्या सहाय्याने शत्रूंशी लढताना दिसत आहे. हा प्री- टीझर रिलीज झाल्यानंतर चाहते ट्रेलरसाठी खूप उत्सुक झाले आहेत. चित्रपटाच्या रिलीजपूर्वी रणबीर कपूरने या चित्रपटासाठी किती मानधन घेतले आणि बाकीच्या स्टारकास्टला किती फी मिळाली, याबद्दल जाणून घेऊयात.

हेही वाचा – Photos: गावाकडचे कौलारू घर, कुटुंब, समुद्रकिनारा अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम निखिल बनेची कोकणात फॅमिली ट्रिप

या चित्रपटात रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. ‘बॉलिवूड लाईफ’च्या वृत्तानुसार, रणबीर कपूरला या चित्रपटासाठी सुमारे ७० कोटी रुपये मानधन मिळाले आहे. रश्मिका मंदान्ना ‘अॅनिमल’ या चित्रपटात मुख्य अभिनेत्री आहे. रश्मिका आणि रणबीर पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. रिपोर्ट्सनुसार, रश्मिकाला या चित्रपटासाठी ४ कोटी रुपये मानधन मिळाले आहे.

अनिल कपूरही ‘अॅनिमल’ या चित्रपटात दिसणार आहे. वृत्तानुसार, अनिल या चित्रपटात रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका साकारणार असून त्यांना या चित्रपटासाठी २ कोटी रुपये फी मिळाल्याची माहिती आहे. बॉबी देओलही या चित्रपटात दिसणार असून त्याने त्याच्या लूकवर खूप काम केले आहे. या चित्रपटासाठी बॉबीला चार कोटी रुपये मानधन मिळाले आहे. तर राघव बिनानीला ५० लाख रुपये फी मिळाली आहे. तसेच बिपीन कार्कीला भूमिकेसाठी ५० लाख रुपये मानधन मिळाल्याची माहिती आहे.

दरम्यान, हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सनी देओलचा आगामी चित्रपट ‘गदर २’ आणि अक्षय कुमारचा ‘ओह माय गॉड’देखील याच दिवशी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे ११ ऑगस्टला अनेक बिग बजेट चित्रपटांची टक्कर पाहायला मिळेल.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranbir kapoor charged 70 crore for animal know rashmika anil kapoor bobby deol fee hrc