richa chaddha troll for galwan tweet netizens trend boycott fukrey 3 hashtag | Loksatta

‘गलवान’चा उल्लेख करत रिचा चड्ढाने केलं ट्वीट, नेटकऱ्यांची fukrey3 बॉयकॉट करण्याची मागणी

रिचा चड्ढाच्या ट्वीटनंतर नेटकऱ्यांनी हॅशटॅग बॉयकॉट fukrey3 केलं ट्रेण्ड

fukrey 3 boycoot trend after richa chaddha tweet
रिचा चड्ढाच्या ट्वीटमुळे वाद निर्माण झाल्यानंतर 'फुकरे ३' बॉयकॉट करण्याची मागणी होत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा तिच्या ट्वीटमुळे चर्चेत आहे. गलवान असा उल्लेख असलेल्या रिचाच्या ट्वीटमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना रिचाने हे ट्वीट केलं होतं.  पंरतु, गलवान शब्दाचा उल्लेख केल्यामुळे रिचाने लष्कराचा अवमान केल्याचा नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे रिचाला ट्रोल केलं जात असून ट्विटरवर तिचा आगामी चित्रपट बॉयकॉट करण्याची मोहीम सुरू झाली आहे.

रिचा चड्ढाचा ‘फुकरे ३’ हा चित्रपट येत्या ३० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. रिचाच्या ट्वीटमुळे या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची मागणी नेटकरी करत आहेत. या ट्वीटमुळे वाद निर्माण झाल्यानंतर नेटकऱ्यांनी ‘boycottfukrey3’ हा हॅशटॅग वापरुन ट्वीट केले आहेत. एका युजरने ट्वीट करत “#Fukrey3 बाय बाय” बॉयकॉट बॉलिवूड असं म्हटलं आहे.

हेही वाचा>> अभिनेत्री रिचा चड्ढाच्या पोस्टमुळे नवा वाद! शहीदांचा अपमान केल्याचा होतोय आरोप; गलवानचा उल्लेख करत म्हणाली…

दुसऱ्या एका युजरने “सगळं लक्षात ठेवणार. रिचा तुझा चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. रिकामे चित्रपटगृह पाहण्यासाठी तयार राहा”, असं ट्वीट करत म्हटलं आहे.

आणखी एका युजरने रिचाचा चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे.

“फुकरे ३ पुढच्या महिन्यात प्रदर्शित होत आहे. रिचा चड्ढा व अली फजल तुम्ही दोघांनीही तुमच्या सीमा पार केल्या आहेत” असं ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, वाद वाढू लागल्यानंतर रिचाने ट्वीट डिलिट करत जाहीर माफी मागितली आहे. “माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता. माझ्या शब्दांमुळे अनावधानाने जरी कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागते,” असं रिचा चड्ढा म्हणाली आहे.

हेही वाचा >> मायोसायटीसमुळे समांथा प्रभू पुन्हा रुग्णालयात दाखल झाली होती?, जाणून घ्या नेमकं सत्य

रिचाचा आगामी ‘फुकरे ३’ हा चित्रपट ‘फुकरे’ या सिनेमाचा सिक्वेल आहे. २०१३मध्ये याचा पहिला भाग प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर २०१७ साली फुकरे २ हा सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘फुकरे ३’साठीही प्रेक्षक आतुर होते. मात्र रिचाने केलेल्या ट्वीटमुळे चित्रपट बॉयकॉट करण्याची मागणी होत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-11-2022 at 14:34 IST
Next Story
आलिया भट्टची घोडदौड सुरूच; हॉलिवूडनंतर आता झळकणार ‘या’ चित्रपटात?