Riteish And Genelia Deshmukh : दिवाळीचा सण सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता बॉलीवूडमधल्या ग्रँड दिवाळी पार्ट्यांना सुरुवात झाली आहे. मंगळवारी रात्री बॉलीवूडचा प्रसिद्ध डिझायनर मनिष मल्होत्राच्या घरी दिवाळी पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीला संपूर्ण बॉलीवूड अवतरलं होतं. आलिया भट्ट, जान्हवी कपूर, वरुण धवन, गौरी व सुहाना खान, काजोल, सिद्धार्थ-कियारा ते रितेश-जिनिलीयापर्यंत सगळे स्टार्स या पार्टीला देसी अंदाजात दाखल झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रितेश – जिनिलीयाकडे ( Riteish And Genelia Deshmukh ) बॉलीवूडची आदर्श जोडी म्हणून पाहिलं जातं. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. याशिवाय या जोडप्याला महाराष्ट्राचे दादा-वहिनी म्हणून देखील ओळखलं जातं. देशमुख जोडपं एकदम पारंपरिक अंदाजात दिवाळी पार्टीसाठी पोहोचलं होतं. जिनिलीयाने पिवळ्या रंगाचा लेहेंगा, डिझायनर ब्लाऊज, त्यावर अबोली रंगाची ओढणी, गळ्यात सिंगल नेकलेस आणि हातात बटवा असा लूक या पार्टीसाठी केला होता. तर, रितेश काळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये अतिशय हँडसम दिसत होता. रितेश-जिनिलीयाने एकत्र पापाराझींसमोर पोज दिल्या. यादरम्यानचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत आणि नेटकरी रितेशवर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

हेही वाचा : सलमान खानचा ३० वर्षे बॉडीगार्ड असलेल्या ‘शेरा’ची गोष्ट! त्याचं खरं नाव, वय माहितीये का? जाणून घ्या…

रितेश देशमुखचं होतंय कौतुक

रितेश सुरुवातीला एकटा गाडीतून उतरला. यानंतर त्याने स्वत: जाऊन जिनिलीयासाठी कारचा दरवाजा उघडला. पत्नीचा ड्रेस मोठा असल्याने त्याने कारमधून उतरत असताना जिनिलीयाला हात दिला. यानंतर पापाराझींचे आभार मानले. कारमधून उतरल्यावर चालत असताना एकदा जिनिलीयाचा तोल देखील गेला मात्र, यादरम्यान रितेशने तिला सावरलं. रितेशच्या या कृतींनी सध्या सर्वांचं मन जिंकून घेतलं आहे.

हेही वाचा : लॉरेन्स बिश्नोईकडून जीवे मारण्याच्या धमक्या; सलमानने न घाबरता घेतला मोठा निर्णय, संपूर्ण टीम लागली कामाला

हेही वाचा : लग्नानंतर ९ वर्षांनी मालिकाविश्वातील ‘मधुबाला’ झाली आई! वयाच्या ३९ व्या वर्षी दिला बाळाला जन्म, पोस्ट शेअर करत म्हणाली…

रितेश हा खरा ‘Green Flag’ आहे. अशा आशयाचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापूर्वी देखील अनंत अंबानी व राधिकाच्या लग्नात पापाराझींसमोर पोज देताना माधुरी दीक्षितला पाहिल्यावर रितेशने तिला हात जोडून नमस्कार केला होता. त्यामुळे अभिनेत्याच्या ( Riteish And Genelia Deshmukh ) संस्कारांचं सोशल मीडियावर नेहमीच कौतुक केलं जातं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Riteish and genelia deshmukh attend diwali party he helps wife through walking due to heavy lehenga watch video sva 00