दिग्दर्शक साजिद खान २०१८ मध्ये ‘हाउसफुल ४’चे शूटिंग करताना त्याच्यावर अनेक महिलांनी #MeToo मोहिमेंतर्गत लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. या आरोपांमुळे त्याचे जीवन पूर्णतः बदलून गेले. तब्बल सहा वर्षे त्याने याबाबत मौन बाळगले. अलीकडेच त्याने एका मुलाखतीत या संदर्भात वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साजिद खानने ‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत गेल्या सहा वर्षांच्या काळाबद्दल सांगितले. साजिद म्हणाला, “या सहा वर्षांत अनेक वेळा स्वतःला संपवण्याचे विचार माझ्या मनात आले. भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी दिग्दर्शक संघटनेनं (IFTDA) परवानगी दिल्यानंतरही मला काम मिळालं नाही. या काळात कमाई नसल्यानं मला माझं घर विकावं लागलं आणि भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहावं लागलं.”

हेही वाचा…३५० कोटींचे बजेट अन् कमावले फक्त…; बायकोचा सिनेमा ब्लॉकबस्टर, तर नवऱ्याचा चित्रपट ठरला सुपरफ्लॉप

साजिद म्हणाला, “करिअरच्या सुरुवातीच्या काळात, मी केवळ चर्चेत राहण्यासाठी खळबळजनक गोष्टी बोलत असे. जेव्हा मी टीव्हीवर काम करीत होतो, तेव्हा माझं काम लोकांचं मनोरंजन करणं होतं. पण, माझ्या काही वक्तव्यांनी मी अनेक लोकांना नाराज केलं. आज मी माझ्या काही जुन्या मुलाखती पाहतो, तेव्हा मला वाटतं की मी टाईम मशीन घेऊन जाऊन स्वतःला थांबवावं आणि सांगावं, ‘अरे मूर्खा, तू काय बोलतो आहेस?. जेव्हा माझ्या वक्तव्यांनी लोकांची मनं दुखावली जात आहेत याची मला जाणीव झाली, तेव्हा मी त्यांची माफी मागितली.”

साजिद पुढे म्हणाला, “जेव्हा तुमच्याकडे काम नसतं, तेव्हा तुम्ही तुमच्या जीवनाबद्दल विचार करू लागता. आता मी शांत झालो आहे. आता मी केवळ कामावर लक्ष केंद्रित करू इच्छितो.”

हेही वाचा…प्रसिद्ध बॉलीवूड गायकाने गुपचूप उरकलं लग्न; पत्नी आहे वयाने मोठी, विवाहसोहळ्याचे फोटो आले समोर

‘हाउसफुल ४’ का सोडला?

साजिदने ‘हाउसफुल ४’ का सोडला, हे स्पष्ट केले. तो म्हणाला, “माझ्या प्रकरणावर (मीटू) माध्यमांनी एकतर्फी खटला चालवला होता. माझ्यामुळे तारखांमध्ये बदल झाला असता आणि चित्रपटाच्या निर्मितीला अडथळा आला असता. निर्माता साजिद नाडियादवालाने १०-१५ व्यग्र कलाकारांसह मोठा सेट तयार केला होता. तारखा बदलल्याने चित्रपट वर्षानुवर्षे लांबला असता.

साजिद म्हणाला, “एक व्यक्ती काम का करते? सन्मानासाठी. जेव्हा तो हिरावून घेतला जातो, तेव्हा तुमचा आत्मसन्मान संशयाच्या भोवऱ्यात सापडतो. मी केलेल्या विनोदामुळे अनेक जण दुखावले; पण मी कधीही महिलांचा अपमान केला नाही आणि कधी करणारही नाही. माझ्या आईने मला लैंगिक समानतेवर विश्वास ठेवायला शिकवले आहे; पण माझ्या काही शब्दांमुळे मला एवढी मोठी किंमत चुकवावी लागेल, हे मला माहीत नव्हते.”

हेही वाचा…Video: लग्नाआधीच प्रेग्नेन्सीमुळे राहिली चर्चेत, ‘ही’ बॉलीवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा होणार आई? ‘तो’ फोटो व्हायरल

साजिदने त्याच्यावर झालेल्या आरोपांवर त्याच्या कुटुंबाच्या प्रतिक्रिया सांगितल्या. तो म्हणाला, “हे आरोप होण्याच्या १० दिवस आधी मी राजस्थानमधील जैसलमेरमध्ये शूटिंग करत होतो आणि माझ्या आईची तब्येत बिघडली होती. मला चित्रपट सोडावा लागल्यानं मला चिंता होती की, जर हे तिला कळलं, तर तिला हार्ट अटॅक येईल. मी माझी बहीण फराह खानला वर्तमानपत्र लपवून ठेवायला सांगितलं होतं. १० दिवस मी सगळं काही ठीक आहे, असं भासवण्याचा प्रयत्न केला. मी घरातून बाहेर जाऊन परत यायचो; जणू मी सेटवर गेलो आहे, असं दाखवायचो… मी कधीच कोणत्याही महिलेविरोधात काही बोललो नाही आणि कधीच बोलणार नाही. गेली सहा वर्षं माझ्या आत्मपरीक्षणाचा काळ होता. ‘मीटू’ प्रकरणात नाव आलेले बाकी सगळे लोक पुन्हा कामावर परतले; पण मला अजूनही काम मिळालेलं नाही. त्यामुळे मला खूप वाईट वाटलं.”

हेही वाचा…‘राम तेरी गंगा मैली’ चित्रपटासाठी मंदाकिनी नव्हे तर ‘या’ अभिनेत्रीला घेणार होते राज कपूर, पण….; अभिनेत्री ४० वर्षांनी खुलासा करत म्हणाली…

साजिद पुढे म्हणाला, “#MeToo आंदोलनाच्या आरोपांनी माझ्यावर खूप मोठा परिणाम केला. त्या काळात मी माझं आयुष्य संपवण्याचा विचार केला होता. सहा वर्षं नुकसान सोसलं. घर गमावलं.”

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sajid khan reflects on career struggles after metoo allegations psg