Shabana Azmi & Javed Akhtar Romantic Dance Video : बॉलीवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी १८ सप्टेंबरला त्यांचा ७५ वाढदिवस साजरा केला. यानिमित्त त्यांनी खास पार्टीचं आयोजन केलं होतं. माधुरी दीक्षित, उर्मिला मातोंडकर, रेखा, संजय कपूर, सोनु निगम, फराह खान यांच्यासह अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी या स्पेशल बर्थडे पार्टीला उपस्थित होते. सध्या या पार्टीमधील अनेक Inside व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खानने शबान आझमी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीतील एक Inside व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये शबाना आझमी व त्यांचे पती जावेद अख्तर सध्या इन्स्टाग्रामवर ट्रेंडिग असणाऱ्या प्रिटी लिटल बेबी ( Pretty Little Baby ) या इंग्रजी गाण्यावर रोमँटिक डान्स करत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहते या दोघांच्या सुंदर केमिस्ट्रीचं कौतुक करत आहेत.

बर्थडे पार्टीला शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी Twinning केल्याचं पाहायला मिळालं. या दोघांनीही डान्स करायला सुरुवात केल्यावर उपस्थित सगळ्याच पाहुण्या कलाकारांनी त्यांना चिअर करण्यास सुरुवात केली.

यावेळी माधुरी दीक्षितचे पती सुरुवातीला शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांच्या डान्सचा व्हिडीओ काढताना दिसले. पण, त्यानंतर व्यवस्थित अँगलने चांगला व्हिडीओ शूट करता यावा यासाठी ते संजय कपूरच्या बाजूला खाली लॉनवर जाऊन बसले आणि डान्सचा व्हिडीओ शूट करू लागले. त्यांच्या या कृतीचं, त्यांच्या साधेपणाचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

डॉ. श्रीराम नेने यांना माधुरीमुळे बॉलीवूडचे जावई म्हटलं जातं. ते सुद्धा तितक्याच उत्साहाने प्रत्येक पुरस्कार सोहळ्याला व पार्ट्यांमध्ये सहभागी होतात. फराह खान या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिते, “तुम्हाला ७५ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शबाना आझमी. तुम्ही दोघंही कायम असेच तरुण राहा”

दरम्यान, फराह खानने शेअर केलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.