मराठमोळी शिबानी दांडेकर ही बॉलीवूड अभिनेता व गायक फरहान अख्तरची दुसरी पत्नी आहे. फरहानचं पहिलं लग्न अधुना भाबानीशी झालं होतं, त्यांना शाक्य आणि अकिरा नावाच्या दोन मुली आहेत. या दोन्ही मुलींशी नातं कसं आहे, याबाबत शिबानी दांडेकरने माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिया चक्रवर्तीला शिबानी दांडेकरने मुलाखत दिली. फरहानशी लग्न केल्यावर शाक्य आणि अकिरा यांनी कुटुंबात कसं स्वागत केलं, ते शिबानीने सांगितलं. तसेच फरहानची पहिली पत्नी अधुना भाबानीने मुलींचं चांगलं संगोपन केलं आहे. मुली मोकळ्या विचारांच्या असल्याने अख्तर कुटुंबात लग्नानंतर फार अडचणी आल्या नाही, असंही शिबानीने नमूद केलं.

Bigg Boss Marathi: अरबाज पटेल घराबाहेर पडल्यावर त्याच्या गर्लफ्रेंडची पोस्ट चर्चेत; शेअर केला ‘तो’ व्हिडीओ

शिबानी म्हणाली, “अख्तर कुटुंबीय अतिशय मोकळ्या विचारांचे आहेत. त्यांच्या विचार करण्याची आणि गोष्टींकडे बघण्याची पद्धत अशी आहे, ज्यामुळे मला कधीच वाटलं नाही की मी या कुटुंबात बाहेरची व्यक्ती आहे. शाक्य आणि अकिरा यांचं संगोपन खूप चांगलं करण्यात आलं आहे. त्या खूप समजदार आहेत, त्यांच्यामुळे माझा या कुटुंबातील प्रवास खूप सोपा झाला.” काही वेळा आव्हानं येतात पण त्याबद्दल कुटुंबियांशी मनमोकळेपणाने बोलता येतं, असंही तिने नमूद केलं.

घटस्फोटित बॉलीवूड अभिनेत्याशी आंतरधर्मीय लग्न केल्यावर मराठमोळी शिबानी झालेली ट्रोल; म्हणाली, “मला लव्ह जिहाद…”

शिबानी व फरहानच्या मुलींचं नातं

फरहान पुढे म्हणाला की त्याच्या मुली आणि शिबानी यांच्यात एक छान बॉण्ड तयार झाला आहे. यावर मुलींचं संगोपन फार चांगलं केलंय याचं श्रेय शिबानीने फरहान आणि अधुना या दोघांना दिलं. “यात त्यांच्या पालकांचे मोठे श्रेय आहे. त्यांनी मुलीचं उत्तम संगोपन केलं ज्यामुळे त्या मोकळ्या विचारांच्या, समजूतदार आहेत, त्या खूप दयाळूही आहेत. त्या दोघी कोणत्याही इतर तरुण मुलींसारख्या नाहीत. त्या दोघींनी मला खूप काही शिकवलं आहे,” असं शिबानी म्हणाली.

तीन वर्षांपूर्वी मुंबई सोडून दुबईत स्थायिक झाला बॉलीवूड अभिनेता; कारण सांगत म्हणाला, “मी भारतात…”

शिबानीची फरहानच्या मुलींच्या आयुष्यातील भूमिका

शिबानीने मुलींच्या आयुष्यातील तिच्या भूमिकेबद्दलही खुलासा केला, फरहानची पहिली पत्नी अधुनाचे कौतुक केले आणि मुलींशी तिचं नातं कसं आहे, ते सांगितलं. “माझा त्यांच्याबद्दलचा दृष्टीकोण खूप साधा होता. कारण त्यांची एक खूप चांगली आई आहे आणि बाबाही आहेत. आम्ही कुटुंबातील इतर लोक जिथे त्यांना गरज असते तिथे त्यांना सपोर्ट करायला असतो. हीच मी त्याच्या आयुष्यातील माझी भूमिका समजते. जेव्हा मुलींना कशाचीही गरज असेल, जेव्हा त्यांच्या पालकांना माझ्या मदतीची गरज असेल, तेव्हा मी तिथे हजर असते,” असं शिबानी म्हणाली.

फरहान आणि अधुना यांचे लग्न २००० साली झाले होते. १७ वर्षांच्या संसारानंतर ते २०१७ मध्ये विभक्त झाले. घटस्फोटानंतर वर्षभराने फरहान आणि शिबानी प्रेमात पडले. त्यांनी २०१८ मध्ये एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली आणि चार वर्षांनी म्हणजेच २०२२ मध्ये त्यांनी लग्न केले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shibani dandekar praised farhan akhtar ex wife adhuna bhabani open up about relationship with stepdaughters hrc