अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा व अभिनेत्री कियारा अडवाणीने ७ फेब्रुवारी रोजी राजस्थानमध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर दोघांनी दिल्लीत रिसेप्शन दिलं होतं. चाहते त्यांच्या मुंबईतील रिसेप्शनची आतुरतेने वाट पाहत होते. आज सिद्धार्थ व कियारा यांनी मुंबईत रिसेप्शनचं आयोजन केलं आहे. त्यांच्या रिसेप्शनला बॉलिवूडकरांनी हजेरी लावली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सिद्धार्थ व कियाराच्या रिसेप्शननिमित्त छान सजावट करण्यात आली आहे. एंट्रीजवल सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांची नावे लिहिली असून नावांभोवती पांढरी फुले लावण्यात आली आहेत. कार्यक्रमस्थळाच्या स्वागत गेटवर सिद्धार्थ आणि कियारा यांच्या नावाचे पहिले अक्षर म्हणजेच एसके लिहिलेले आहे. ही जागा फुलांनी सजवलेली आहे.

सिद्धार्थ व कियाराचा रिसेप्शन लूक सध्या चर्चेत आहे. पार्टीत कियाराने ब्लॅक अँड व्हाईट डीप नेक गाऊन परिधान केला होता. कियाराने हिरव्या रंगांचा लाँग नेकलेस घालून तिचा लूक पूर्ण केला होता. तर, सिद्धार्थने काळा सूट घातला होता.

सिद्धार्थ व कियाराच्या रिसेप्शनला अजय देवगण-काजोल, आलिया भट्ट, अभिषेक बच्चन यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sidharth malhotra kiara advani wedding reception in mumbai check out their look hrc