बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही इंडस्ट्रीतील सर्वात स्टायलिश अभिनेत्रींपैकी एक आहे. सोनम खूप आलिशान आयुष्य जगते. ‘सावंरिया’ चित्रपटातून सोनमने बॉलिवूडमध्ये पदापर्ण केलं. तिचे ‘निरजा’, ‘रांझणा’, ‘वीरे दी वेडिंग’, ‘प्रेम रतन धन पायो’ या चित्रपट चांगलेच गाजले. कपूर घराण्यात जन्मलेली सोनम लैंगिक शोषणाची शिकार झाली आहे. १३ वर्षांची असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा खुलासा खुद्द अभिनेत्रीनेच केला होता. या घटनेने अभिनेत्री सोनम घाबरली होती. सोनमला वाटले की आपण काहीतरी चुकीचे केले आहे, त्यामुळे तिने याबद्दल कोणालाच सांगितले नव्हते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- नेहा कक्कर रोहनप्रीतमध्ये बिनसलं? गायिकेच्या वाढदिवसाला पती गैरहजर; इतकंच नव्हे तर…

सोनमने ‘अक्ट्रेस राऊंडटेबल’ या राजीव मसंद यांच्या शोला हजेरी लावली होती. या मुलाखतीत सोनमने तिच्या बरोबर घडलेला प्रसंग सांगतिला होता. १३ वर्षांची असताना सोनमबरोबर एका व्यक्तीने लैंगिक छळ करण्याचा प्रयत्न केला होता. खुद्द सोनमनेच याबाबतचा खुलासा केला आहे. सोनम म्हणाली “प्रत्येकजण बालपणात कधी ना कधी लैंगिक शोषणाचा बळी पडतो. मला माहित आहे की माझ्या लहानपणी माझाही विनयभंग झाला होता आणि तो माझ्यासाठी खूप मोठा आघात होता. सुमारे दोन-तीन वर्षे मी याबद्दल कोणालाही सांगितले नव्हते. ती घटना मला आजपर्यंत पूर्ण आठवते.”

सोनम पुढे म्हणाली, “ही घटना मुंबईतील गेटी गॅलेक्सी थिएटरमध्ये घडली जिथे मी माझ्या मैत्रिणींबरोबर चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. आम्ही काही खायला घेण्यासाठी बाहेर आलो तेव्हा एक माणूस माझ्या मागून आला आणि त्याने माझे स्तन दाबले. या घटनेमुळे मी थरथऱ कापू लागले होते. मला काय होतयं ते समजलंच नाही. मी तिथेच रडायला लागले. पण मी याबद्दल कोणाशीही बोलले नाही. मी परत आत जाऊन बसले आणि संपूर्ण चित्रपट पाहिला. कारण त्यावेळी मला वाटलं की मी काहीतरी चूक केली आहे.”

हेही वाचा- “मी कोणाला मिठीही मारायचे नाही”, ओम-क्रितीच्या ‘त्या’ व्हिडीओवर सीतेची भूमिका साकारणाऱ्या दीपिका चिखलिया यांचे स्पष्ट मत

सध्या सोनम मातृत्वाचा आनंद घेत आहे. सोनमने २०१८मध्ये आनंद अहुजाशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. सोनम व आनंद अहुजा आता आईबाबा झाले आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सोनमने गोंडस बाळाला जन्म दिला. सोनमने आपल्या मुलाचं नाव त्यांनी ‘वायू’ असं ठेवलं आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonam kapoor talk about she was sexually abused in theater at the age of 13 dpj