‘प्यार का पंचनामा’ फेम अभिनेत्री सोनाली सेहगल ७ जून २०२३ रोजी व्यावसायिक आशीष सजनानीबरोबर लग्न केले. सोनालीने तिच्या लग्नसोहळ्यातील अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. सोनालीच्या लग्नाला तिचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : नातवाच्या रिसेप्शनमध्ये धर्मेंद यांनी सादर केली भावुक कविता; अनुपम खेर व्हिडीओ शेअर करीत म्हणाले, “धरमजी…”

अभिनेत्री सोनाली सेहगल आणि आशीष सजनानी एकमेकांना गेल्या पाच वर्षांपासून ओळखत होते. अभिनेत्री तिच्या रिलेशनशिपबाबत कोणतीच माहिती उघड केली नव्हती. दरम्यान, आता लग्नानंतर सोनाली नवऱ्याबरोबर हनिमूनसाठी मालदीवला गेली आहे. मालदीवमधील सुंदर फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हेही वाचा : अजय देवगण नव्हे तर बॉलीवूडच्या ‘या’ अभिनेत्याचे केले काजोलने कौतुक; म्हणाली “तो पूर्ण काळजी…”

सोनाली सेहगल आणि आशीष सजनानी लग्नानंतर मालदीवमध्ये एकमेकांना खास वेळ देत आहेत. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हनिमूनचे काही फोटो शेअर केले आहेत. सोनालीने मालदीवमध्ये गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचा स्लिट गाऊन ड्रेस परिधान केला असून, या सगळ्या फोटोंमध्ये अभिनेत्रीच्या मंगळसूत्राने नेटकऱ्यांचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. सोनालीने गळ्यात इन्फिनिटी चिन्हाच्या डिझाईनचे मंगळसूत्र घातले आहे. एकंदर सोनालीचा मालदीव लुकचे नेटकऱ्यांनी भरभरुन कौतुक केले आहे. करण ग्रोव्हरने अभिनेत्रीच्या फोटोंवर “अतिसुंदर…” अशी कमेंट केली आहे.

दरम्यान, सोनाली सेहगल जवळपास १२ वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीत काम करीत आहे. २०११ मध्ये रिलीज झालेल्या ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटाद्वारे तिने आपल्या बॉलीवूड करिअरची सुरुवात केली होती. यानंतर ‘वेडिंग पुलाव’, ‘प्यार का पंचनामा २’, ‘जय मम्मी दी’ या चित्रपटांमध्ये अभिनेत्रीने काम केले.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sonnalli seygall is celebrating honeymoon with husband in maldives sva 00