नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक अशी गोविंदा(Govinda)ची ओळख आहे. अभिनेत्याचे ‘कुली नंबर १’, ‘राजा बाबू’ सारखे चित्रपट आजही प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतात. याबरोबरच, अभिनेता त्याच्या व्यक्तव्यामुळेदेखील बऱ्याचदा चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी अभिनेत्याला गोळी लागली होती. अपघाताने अभिनेत्याकडूनच पायाला गोळी लागली होती. त्यावेळी गोविंदाची पत्नी सुनिता अहुजा घरी नव्हती. आता त्यावेळी नेमके काय घडले होते, याबद्दल गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाने एका मुलाखतीत वक्तव्य केले आहे. याबरोबरच, गोविंदाला गोळी लागल्यानंतर त्यांच्यात फोनवर काय संवाद झाला होता, यावरही सुनीता आहुजाने वक्तव्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुनीता आहुजा काय म्हणाली?

हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की मी कधीच कोणत्याच परिस्थितीत गोंधळून जात नाही. गोविंदाला ज्यावेळी गोळी लागली होती, त्यावेळची आठवण सांगत म्हटले, “मला माझ्या ड्रायव्हरने फोन केला आणि सांगितले की साहेबांना गोळी लागली. मी त्याला म्हटले की गोळी लागली की कोणी मारली? त्यानंतर त्याने सांगितले की बंदुक ठेवते होते. ती खाली पडली. त्यानंतर गोविंदाचे माझ्याशी बोलणे झाले. त्याने मला सांगितले की गोळी लागली. मी त्याला म्हटले की तू स्वत:च तर गोळी मारून घेतली नाहीस? त्यावर त्याने म्हटले की अजूनही तुला विनोद सुचत आहे? त्यानंतर मी त्याला शांत व्हायला सांगितले. मला भीती वाटत होती की त्याला हार्ट अटॅक येऊ शकतो. माझी मुलगी टीना घरी होती. मी तिला फोन करून गोंधळून जाऊ नकोस, असे सांगत तिला दवाखान्यात घेऊन जाण्यास सांगितले आहे. मी कधीच कोणत्या परिस्थितीत गोंधळून जात नाही”, असे म्हणत गोविंदाला गोळी लागली होती, त्याला त्याला न घाबरता शांत राहण्यास सांगितले होते, असे म्हणत सुनीता आहुजा त्या प्रसंगाबद्दल व्यक्त झाली आहे.

याबरोबरच अनेकदा सुनीता आहुजाला तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ट्रोल केले जाते, यावर बोलताना सुनीता आहुजाने म्हटले, “ट्रोल्सचा माझ्यावर काहीही फरक पडत नाही. लोकांच्या प्रतिक्रियेमुळे मी स्वत:ला किंवा माझ्या स्वभावाला अजिबात बदलणार नाही. मी जशी आहे, तशी आहे. जर तुम्हाला मी आवडत असेल तर तुम्ही माझ्याशी बोलाल. नसेल तर तुम्ही निघून जाऊ शकता. ट्रोल्समुळे मी कायम बातम्यांमध्ये असते.”

गोविंदाला गोळी लागल्याच्या घटनेबद्दल ‘हिंदी रश’शी बोलताना सुनीता आहुजाने म्हटले होते की त्या घटनेवेळी मी मुंबईत नव्हते. मुलगा यश हा बँकॉकमध्ये होता. मी गोविंदाला याबद्दल सांगितले नाही मात्र मी सुद्धा खाटू श्यामकडे प्रार्थना करण्यासाठी गेले होते. गोविंदा त्या दिवशी कोलकाताला दुर्गापूजेसाठी जाणार होता. माझ्या ड्रायव्हरने जेव्हा मी फोन केला तेव्हा मी मेडिटेशन करत होते. इतरवेळी मी मेडिटेशन करताना फोन उचलत नाही. पण, त्यादिवशी मी तो फोन घेतला आणि ड्रायव्हरने काय घडले ते सांगितले.

दरम्यान, गोविंदाने काही दिवसांपूर्वी द इंडियन कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी लवकरच चित्रपटातून पुनरागमन करणार असल्याचे त्याने म्हटले होते. आता गोविंदा कोणत्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunita ahuja reveals when govinda accidentally shot himself i feared he might get a heart attack says told him not to panic nsp