बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या नावे एका सरकारी योजनेचा लाभ घेण्यात आला आहे. चक्क तिच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होत होते. छत्तीसगड सरकारची ‘महतारी वंदन योजना’ (Mahatari Vandan Yojana) आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सनी लिओनीचे नाव आहे. इतकंच नाही तर सरकारने तिच्या नावावर पैसेही पाठवले. आता सनीने या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

छत्तीसगडमधील एका व्यक्तीने आर्थिकदृष्ट्या अक्षम विवाहित महिलांना दरमहा एक हजार रुपये देण्याच्या सरकारी योजनेंतर्गत लाभार्थी म्हणून सनी लिओनीच्या नावे खातं उघडलं होतं. सनीला यासंदर्भात माहिती मिळाल्यावर तिने या कृत्याबद्दल संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा – Video: “तासाला १ कोटी कमावता, इथे काय करताय”? ‘शार्क टँक’मध्ये आलेल्या प्रसिद्ध युट्यूबरला विनीता सिंहचा सवाल

सनी लिओनीची प्रतिक्रिया

सनीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं, “छत्तीसगडमधील फसवणुकीच्या घटनेबद्दल मला समजलं. हे खूप दुर्दैवी आहे. माझी ओळख आणि नाव फसवणुकीसाठी वापरण्यात आले आहे. महिला सक्षमीकरणासाठी सरकारने आणलेल्या योजनेचा अशा प्रकारे गैरवापर होतोय हे पाहून वाईट वाटत आहे.”

हेही वाचा – प्रसिद्ध अभिनेत्याचा २४ वर्षांचा संसार मोडला, २१ व्या वर्षी वयाने मोठ्या अभिनेत्रीशी कुटुंबियांचा विरोध पत्करून केलेलं लग्न

सनी लिओनीची इन्स्टाग्राम स्टोरी

ती पुढे म्हणाली, “मी या कृत्याचा तीव्र निषेध करते. तसेच या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे.”

हेही वाचा – Video: रणवीर सिंह-दीपिका पादुकोणने दाखवला लेकीचा चेहरा, खास ‘या’ लोकांसाठी ठेवली पार्टी

नेमके प्रकरण काय?

छत्तीसगड सरकार विवाहित महिलांना ‘महतारी वंदन योजने’अंतर्गत दर महिन्याला १००० रुपये देते. या योजनेत एका व्यक्तीने सनी लिओनीच्या नावाने ऑनलाइन खातं उघडलं होतं. त्या खात्यात तिला लाभार्थी म्हणून पैसे मिळत होते. महतरी योजनेच्या वेबसाईटवर सनी लिओनीच्या नावे खातं होतं. तिच्या पतीचे नाव जॉनी सिन्स नोंदवण्यात आले आहे. बस्तरमध्ये एका अंगणवाडीतून हा अर्ज करण्यात आला होता. या योजनेचे काही हप्ते सनी लिओनीच्या नावे असलेल्या खात्यात जमा झाले होते, अशी माहिती समोर आली आहे.

हेही वाचा – लेकीला शिकायला अमेरिकेला पाठवल्याने अजूनही होतंय ट्रोलिंग; शरद पोंक्षे म्हणाले, “काही लोकांच्या…”

सनी लिओनीच्या नावे बनावट अकाउंट उघडून या योजनेचा लाभ घेतला जात असल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर बस्तरचे अधिकारी तपास करत आहेत. जिल्हा प्रशासनाकडून तक्रार करण्यात आल्यास कारवाई केली जाईल, असं वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने सांगितलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunny leone reacts on her name in chhattisgarh govt scheme calls it unfortunate hrc