अभिनेत्री सुश्मिता सेनचे नाव अनेक बॉलिवूड अभिनेत्यांशी जोडले गेले. यामध्ये दिग्दर्शकांपासून ते अभिनेते आणि क्रिकेटपटूंच्या नावांचा समावेश आहे. पण तिचं कोणाशीही नातं फार काळ टिकू शकलं नाही. सुश्मिता मॉडेल रोहमन शॉलबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. पण, सुश्मिताने डिसेंबर २०२१ रोजी रोहमन शॉलशी ब्रेकअपची घोषणा केली होती. त्यानंतर तिचं नाव ललित मोदीशी जोडलं गेलं होतं. आता पुन्हा एकदा सुश्मिता व रोहमन एकत्र दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आदिपुरुष’चा मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊतचं शिक्षण किती? जाणून घ्या त्याच्या कौटुंबीक पार्श्वभूमीबद्दल

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात सुश्मिता एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल व लेकीबरोबर पोहोचली होती. या व्हिडीओमध्ये रोहमन सुश्मिताला कारपासून पिक करताना व नंतर तिच्याबरोबर इव्हेंटमध्ये पोज देताना दिसत आहे. त्यामुळे या दोघांचं पुन्हा पॅचअप झालं की काय, अशा चर्चा सुरू आहेत. दोघांचा हा व्हिडीओही खूप व्हायरल होत आहे.

दरम्यान, फेब्रुवारी महिन्यात सुश्मिताला हृदयविकाराचा झटका आला होता आणि तिची अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. या कठीण काळात एक्स बॉयफ्रेंड रोहमन शॉल तिला साथ देत होता. सुश्मिता बरी होत असताना तो तिला वर्कआउटमध्ये मदत करत होता. दोघांच्या वर्कआउटचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushmita sen rohman shawl back together after breakup video gone viral hrc