बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर लवकरच आई होणार आहे. स्वराने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही गुडन्यूज दिली आहे. स्वरा व फहाद अहमद लवकरच आईबाबा होणार आहेत. स्वराने जानेवारी महिन्यात फहाद अहमदशी लग्न केलं होतं. लग्नाच्या चार महिन्यांनंतर स्वरा गरोदर आहे. ऑक्टोबर महिन्यात स्वरा बाळाला जन्म देणार असल्याचं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्वराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन बेबी बंप फ्लाँट करतानाचे फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. लग्नाआधीच स्वरा गरोदर असल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. “लग्नाचं खरं कारण समोर आलं आहे,” अशी कमेंट एकाने केली आहे.

हेही वाचा>> “मी आणि अजितदादाने हा सिनेमा पाहिला”, TDM चित्रपटासाठी सुप्रिया सुळेंची पोस्ट, म्हणाल्या, “बारामतीतील सुपुत्र…”

“लग्न करण्यामागचं हेच कारण आहे,” असं म्हटलं आहे.

“गडबड होती म्हणूनच निकाह झाला,” अशी कमेंटही केली आहे.

“या बातमीमुळे काहीही आश्चर्य वाटलं नाही. तुम्हाला वाटते तितके आम्ही मुर्ख नाही आहोत,” असं एकाने म्हटलं आहे. तर एका नेटकऱ्याने “आधी गरोदर राहायचं मग लग्न करायचं, बॉलिवूडमध्ये हा नवीन ट्रेंड आला आहे,” अशी कमेंट करत स्वराला ट्रोल केलं आहे.

स्वरा व फहाद अहमदने जानेवारी महिन्यात कोर्ट मॅरेज केलं होतं. एक महिन्यानंतर फोटो पोस्ट करत स्वराने लग्न केल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात स्वरा व अहमदने साखरपुडा व पारंपरिक पद्धतीने लग्न केलं. आता ते लवकरच आईबाबा होणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Swara bhasker shared pregnancy news netizens troll said new trend in bollywood kak