बॉलीवूड सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आर्यनने अलीकडेच दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. काही दिवसांपूर्वी आर्यनने एक जाहिरात दिग्दर्शित केली होती. या जाहिरातीत शाहरुख खानने काम केले होते. यानंतर आता आर्यन खान दिग्दर्शित ‘स्टारडम’ नावाची वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा : लाहोरची संस्कृती, इस्लाम धर्माचा अभ्यास…” ‘गदर’चित्रपटासाठी अमीषा पटेलने घेतली होती प्रचंड मेहनत; म्हणाली…
आर्यन खानच्या ‘स्टारडम’वेब सीरिजमध्ये लक्ष्य लालवानी मुख्य भूमिका साकारणार असून या सीरिजचे एकूण सहा भाग प्रदर्शित केले जाणार आहेत. या वेब सीरिजच्या मुख्य भूमिकेसाठी तब्बल ८०० ऑडिशन्स घेण्यात आल्या होत्या. त्यानंतर लक्ष्य लालवानीची निवड करण्यात आली आहे. सध्या वरळीमधील एका मिलमध्ये या वेब सीरिजची शूटिंग सुरु आहे.
हेही वाचा : ‘जरा हटके जरा बचके’ चित्रपटासाठी विकी कौशलने शेअर केली खास पोस्ट म्हणाला, “दोन आठवडे झोपलो नाही, पण…”
मिड-डेच्या रिपोर्टनुसार आर्यन खान दिग्दर्शित या वेब सीरिजमध्ये बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर
‘स्टारडम’वेब सीरिज ओटीटी माध्यमावर रिलीज करण्यात येणार असून यामध्ये आणखी काही बॉलीवूड सेलिब्रिटी कॅमिओ करू शकतात असे सांगण्यात येत आहे. ही वेब सीरिज शाहरुख खान
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.